Mumbai, 10 May : अशोक खरात प्रकरणी आज (ता. 10 मे) राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची एसआयटीकडून साडेपाच तास कसून चौकशी करण्यात आली. मात्र, आजची चौकशी फक्त नावापुरती होती, हा नुसता फार्स आहे. कदाचित त्यांना क्लीनचिट देण्यासाठी बोलावं असेल का? अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, रुपाली चाकणकर यांच्या आजच्या (ता. 10 मे) चौकशीतून फार महत्वाचं पुढं येईल, त्यातून फार काही निष्पन्न होईल, असं मला अजिबात वाटत नाही. कारण ज्या घटनेत ‘टॉप टू बॉटम’ सगळीकडे रुपाली चाकणकर व्याप्त आहेत, त्यांचा संबंध सगळीकडे आहे. त्या चाकणकरांना तब्बल दोन महिन्यांनंतर एसआयटीने चौकशीसाठी बोलावले आहे. विशेष चाकणकर यांच्या बहिणीला अगोदर बोलावण्यात आली. त्यानंतर रुपाली चाकणकर यांंना बोलाविण्यात आले आहे.
सध्या अशी चर्चा ऐकायला मिळते आहे की, आजची चौकशी फक्त नावापुरती होती, तो नुसता फार्स होता. कदाचित रुपाली चाकणकर यांना क्लीनचिट देण्यासाठीच बोलावलं असेल का? अशी जोरदार चर्चा सुरू आहे त्यामुळे आज नेमकं साडेपाच तास खरंच चौकशी झाली की, दिलासा देण्याबाबतचा खुलासा अधिकाऱ्यांनी केला आहे, नेमकं काय केलं, हे आम्हाला कळत नाही, असा सवालही अंधारे यांनी उपस्थित केला.
त्या म्हणाल्या, रुपाली चाकणकर यांची पहिल्या आठवड्यातच चौकशी व्हायला पाहिजे होती. त्यांना सगळ्या गोष्टी माहित असताना त्यांनी गुन्हेगारांना ज्या पद्धतीने अभय दिलं. गुन्हेगाराला वाचवण्यासाठी आपल्या खुर्चीचा गैरवापर करण्यात आला. त्यामुळे त्यांच्यावर थेट आरोपपत्र ठेवणं अपेक्षित होतं. पण ते झालं नाही,
चाकणकर यांना दोन महिन्यांतर चौकशी बोलावण्यात आले आहे, याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, दोन महिन्यांनंतर चाकणकरांना नावापुरतं चौकशीला बोलवण्यात आलं असावं. त्यांना फार शिक्षा वैगरे करण्याच्या भानडीत कोणी पडणार आहे, असं आम्हाला अजिबात वाटत नाही. त्यामुळे आम्ही फार अपेक्षाही करत नाही, असेही विधान सुषमा अंधारे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.