Sushma Andhare drops a political bomb by releasing a video challenging Chandrashekhar Bawankule’s statement on the Praveen Gaikwad incident.  Sarkarnama
मुंबई

Sushma Andhare Video : दीपक काटेंशी संबंध नाही म्हणणाऱ्या बावनकुळेंवर अंधारेंनी टाकला व्हिडीओ बॉम्ब; 24 तासांत पलटवार

Chandrashekhar Bawankule’s Statement on Deepak Kate : सुषमा अंधारे यांनी ‘एक्स’वर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामुळे बावनकुळे हे एका राजकीय व्यासपीठावर दीपक असे नाव घेताना दिसत आहेत.

Rajanand More

Sushma Andhare’s Video Revelation : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासल्याप्रकरणी दीपक काटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक काटे हे भाजपशी संबंधित असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मात्र, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी काटे यांचा भाजपशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले होते. शिवसेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी 24 तासांत त्यावर पलटवार केला आहे.

सुषमा अंधारे यांनी ‘एक्स’वर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामुळे बावनकुळे हे एका राजकीय व्यासपीठावर दीपक असे नाव घेताना दिसत आहेत. हे दीपक म्हणजेच दीपक काटे असल्याच दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. दीपक काही काळजी करायची गरज नाही, मी आणि देवेंद्रजी तुमच्यासोबत आहोत, असे बावनकुळे या व्हिडीओत म्हणत आहेत.

काय आहे व्हिडीओमध्ये?

बावनकुळे या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत की, ‘दीपक, एक कार्यकर्ता आहे, त्याला कुणीतरी गुन्हेगार ठरवले. मागच्या सरकारच्या काळात अन्याय केला. मी मागच्यावेळी आलो तेव्हा दीपक तुला सांगतलं होतं, चिंता करायची गरज नाही. देवेंद्रजी आणि मी आपल्याबरोबर आहे, काही काळजी करायची गरज नाही,’ असे म्हणताना बावनकुळे या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

अंधारेंकडून टीका

अंधारे यांनी सोशल मीडियातील पोस्टमध्ये बावनकुळेंना टॅग करत टीका करताना म्हटले आहे की, कालपर्यंत तुम्ही काटेला ओळखत नव्हता ना? प्रदेशाध्यक्ष म्हणून पद आणि जबाबदारीचे वितरण करणे हे तुमचे काम म्हणजे दीपक काटे या सराईत गुन्हेगाराला भाजूयूमोचे प्रदेश सरचिटणीस पद तुम्ही दिले. गुन्हेगाराच्या पाठीशी आहोत याचा कबुली जबाब देता. इतका कोडगेपणा येतो कुठून?, असा सवालही अंधारेंनी केला आहे.

दरम्यान, गायकवाड यांना काळे फासणारे दीपक काटे आणि अन्य काही सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा मुद्दा चांगलाच तापला असून सोमवारी विधिमंडळाच्या अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन विधानसभेत दिले आहे. तर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी या हल्ल्यामागे भाजपचा संबंध असल्याचा आरोप केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT