Sushma Andhare News Sarkarnama
मुंबई

Sushma Andhare Notice To her Husband: सुषमा अंधारेंची विभक्त पतीला ५ कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस; काय आहे प्रकरण?

सरकारनामा ब्यूरो

Sushma Andhare Send Notice To her Husband: ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपले विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांना 5 कोटी रुपये नुकसान भरपाईची कायदेशीर नोटीस पाठल्याची माहिती समोर आली आहे. ॲडव्होकेट असीम सरोदे,ॲड श्रीया आवले,ॲड. बाळकृष्ण निढाळकर यांच्यामार्फत 5 कोटींची नुकसान भरपाई मागणारी अब्रुनुकसानीची नोटीस वैजनाथ वाघमारे यांना पाठवण्यात आली आहे.

तसेच, गुगल आणि युट्युब ला सुद्धा नोटीस पाठवून सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स वरून बदनामीकारक व स्त्रीत्वाचा अपमान करणारा मजकूर, व्हिडिओ काढून टाकावा अशी मागणीही करण्यात आली आहे. सुषमा अंधारे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर त्यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. सुषमा अंधारे यांच्यावर त्यांनी अनेक बदनामीकारक आरोपही केले होते. याविरोधात आता अंधारेंनी पाऊल उचलले आहे.

गेल्या आठवड्यात वैजनाथ वाघमारे यांनी सुषमा अंधारेंवर गंभीर आरोप केले होते. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच केज जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांची हकालपट्टी केली. शिंदे यांच्या भागीदारीत चालवल्या जाणाऱ्या कला केंद्रावर पोलिसांनी धाड टाकली होती.या ठिकाणी अल्पवयीन मुलींचे शोषण केले जात असल्याची माहिती पोलिसांनी कळाली होती.

या पार्श्वभूमीवर वैजनाथ वाघमारे यांनी रत्नाकर शिंदेंना जिल्हाप्रमुख करण्यासाठी सुषमा अंधारे यांनी 25 लाख रुपये घेतल्याचा आरोप केला होता.तसेच कला केंद्र चालव मी आहे, पोलीस कारवाई होऊ देणार नाही, असं पाठबळही त्यांनी दिलं होतं. कला केंद्राच्या माध्यमातून गैरप्रकारांना पाठबळ देणाऱ्या अंधारेंची पक्षातून ठाकरेंनी हाकालपट्टी करावी , अशी मागणी वाघमारे यांनी केली होती.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT