Balasaheb Thorat : तीन तलवारी एकाच म्यानात.. ; थोरातांनी शिंदे-फडणवीस-पवारांना डिवचलं...

Maharashtra Politics : नवीन उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री व्हायचयं
Maharashtra Politics News
Maharashtra Politics News Sarkarnama
Published on
Updated on

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज (रविवारी) शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीका केली. थोरात हे माध्यमांशी बोलत होते. "सध्याच्या सरकारबाबत जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. जनतेच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

बाळासाहेब थोरात म्हणाले, "सध्याच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री असलेले आता उपमुख्यमंत्री आहेत, नवीन उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री व्हायचयं आहे. अशी गोंधळाची परिस्थिती पूर्वीच्या राजकारणात राहिली नव्हती. सध्या तीन तलवारी एका म्यानात आहेत. एका वर्षात दोनदा पक्ष फोडणं असे आजपर्यंत कधी झालेलं नाही. आमदारांमध्ये संघर्षाचं वातावरण आहे,"

आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेलेल फुटीनंतर विरोधीपक्षनेते पद काँग्रेसकडे येणार आहे. महराष्ट्र काँग्रेसमध्ये देखील बदलाच्या चर्चा मागील काही दिवसांपासून होतं आहे. दिल्लीत काँग्रेसची महत्वाची बैठक झाली. याबद्दल लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. यावर थोरात यांनी सांगितले की काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद मिळणार आहे.

Maharashtra Politics News
Rohit Pawar : ट्रक चालक ठाण्याचा की ट्रकचा चेसी बारामतीचा.. ; रोहित पवारांनी शिंदे-फडणवीसांना हिणवले

अजित पवारांसोबत ३० हून जास्त आमदार असल्याचे बोलले जात आहे. आमदारांची नेमकी संख्या अद्याप कोणीही स्पष्ट केलेली नाही. मात्र राष्ट्रवादीतील फुटीमुळे पक्षाची विधानसभेतील ताकद मात्र कमी झाली आहे. त्यामुळे मविआमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमिवर राज्यातील विरोधीपक्षनेते पद काँग्रेसकडे जाणार आहे.

Maharashtra Politics News
Pune News : अजितदादांचा 'मास्टर स्ट्रोक' ; जलसंधारणाची ५० कोटींची कामे मार्गी

शरद पवार पुन्हा पक्षाची उभारणी करु शकतील का, याबाबत बाळासाहेब थोरातांनी दोन दिवसापूर्वी एका मुलाखतीत सांगितले की “शरद पवार राज्यात फिरून लोकसभा आणि विधानसभेला चांगला निकाल आणतील. शरद पवार फक्त नमस्कार करत फिरले, तरी राष्ट्रवादी पक्ष उभा राहिल. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार निवडून येतील.”

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com