Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Thane Lok Sabha News: ठाण्याच्या जागेवरून सस्पेन्स कायम; महायुतीमध्ये रस्सीखेच, इच्छुकांकडून शक्तिप्रदर्शन

Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटालाच ठाणे लोकसभा मतदारसंघ मिळणार असल्याचा दावा सातत्याने केला जात आहे. मात्र, हा मतदारसंघ भाजपला की शिवसेना शिंदे गट यापैकी कोणाला सुटणार यावरून सस्पेन्स कायम आहे.

Sachin Waghmare

Thane News : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने हा मतदारसंघ कोणाला सुटणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटालाच ठाणे लोकसभा मतदारसंघ मिळणार असल्याचा दावा सातत्याने केला जात आहे. मात्र, हा मतदारसंघ भाजपला की शिवसेना शिंदे गट यापैकी कोणाला सुटणार यावरून सस्पेन्स कायम आहे. दुसरीकडे मात्र लोकसभेसाठी इच्छुक असलेल्याकडून शकीतीप्रदर्शन केले जात आहे.

या मतदारसंघामध्ये भाजपच्या (Bjp) इच्छुकांनीही मोर्चेबांधणी सुरू केल्यामुळे ठाण्याच्या उमेदवारीबद्दल प्रचंड कुतुहल आहे. या मतदारसंघातून शिंदे गटाकडून आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik), माजी आमदार रवींद्र फाटक (Ravindra Phatak), माजी महापौर मीनाक्षी शिंदे तर भाजपकडून संजीव नाईक, संजय केळकर यांची नावे चर्चेत आहेत या पैकी कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. (Thane Lok Sabha News)

या निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून ठाण्यात रविवारी महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ठाणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीने प्रथमच सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा सखी महोत्सव होत आहे. हायलँड पार्क मैदानात होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या महोत्सवाला परिसरातून ५० हजार महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून या माध्यमातून मोठे शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने वैशाली दरेकर यांच्या रूपाने महिला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे लोकसभा मतदारसंघात देखील मीनाक्षी शिंदे यांच्या माध्यमातून महिला उमेदवाराला निवडणूक रिंगणात उतरविण्याचा प्रयत्न शिवसेना शिंदे गटाकडून केला जात असून त्यासाठी या मेळाव्याच्या माध्यमातून चाचपणी केली जात असल्याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरे गटाकडून प्रचार सुरु

ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून विद्यमान खासदार राजन विचारे यांची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून सर्व मतदारसंघ पिंजून काढला आहे.कोकणातील मतदारसंघ भाजपला मिळाल्याने ठाणे लोकसभा मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेला मिळाल्याचे निश्चित मानले जात आहे. परंतु प्रत्यक्ष अधिकृत घोषणेनंतरच हे चित्र स्पष्ट होणार आहे.

SCROLL FOR NEXT