Thane Lok Sabha Election : 'मुख्यमंत्री पुत्र मग तुम्ही घराणेशाहीचे प्रॉडक्ट नाही का?' श्रीकांत शिंदेंनी दिलं उत्तर...

Lok Sabha Election 2024 : "परिवाराच्या नावावर फार तर तुम्ही एका वेळेस निवडून येऊ शकता पण...." श्रीकांत शिंदेनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल...
Thane Lok Sabha Election
Thane Lok Sabha ElectionSarkarnama

Thane News : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे दावेदार उमेदवार खासदार श्रीकांत शिंदे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंवर घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. अत्यंत सुरक्षित अशा वरळी विधानसभा मतदारसंघात त्यांना पॅरॅशूट लँडिंग करुन त्यांची राजकीय व्यवस्था केली गेली, असे शिंदे म्हणाले. यामुळे आदित्य ठाकरे हे घराणेशीहीतूनच पुढे आले आहेत, असा सूर शिंदे यांनी आवळला. (Lok Sabha Election 2024)

'आज तक' या हिंदी वृत्तवाहिनीशी खासदार श्रीकांत शिंदे यांनी संवाद साधला. यावेळी शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला की, "दहा वर्ष तुम्ही खासदार आहात. विरोधकांचा आरोप आहे की, त्यांची घराणेशाही आणि तुमची घराणेशाही वेगळं कसं? आदित्य ठाकरेही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र आहेत. त्याप्रमाणे तुम्हीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहात. मग तुम्हीही घराणेशाहीचे 'प्रॉडक्ट' नाहीत का?"

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Thane Lok Sabha Election
Uddhav Thackeray News : 'जय भवानी' शब्दावर आक्षेप घेणाऱ्या आयोगाच्या नोटीसीला ठाकरेंकडून केराची टोपली

यावरे उत्तर देताना श्रीकांत शिंदे म्हणाले, "मी तर काहीच नव्हतो. माझं एकीकडे मेडिकलचं शिक्षण सुरु होतं. तेव्हा मी निवडणुकीत उतरलो. सर्व शिवसैनिकांनी (Shiv Sena) मोठ्या मताधिक्याने मला निवडून दिलं. लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवलं. पाच वर्षात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्ही कामं केली. निवडणुकीत लोकांनी मला अडीच लाखांच्या मताधिक्याने विजयी केलं. त्यानंतर दुसऱ्या निवडणुकीत साडेतीन लाखाच्या मताधिक्याने विजयी केलं. आता पुन्हा मी निवडणुकीला सामोरे जात आहे. आता विक्रमी मताधिक्याने निवडून येणार आहे."

Thane Lok Sabha Election
Fire In BJP office Mumbai : मोठी बातमी! मुंबईच्या भाजप कार्यालयात आगीचं थैमान; भीषण दुर्घटना...
Thane Lok Sabha Election
NCP News: दक्षिण महाराष्ट्रातून ‘घड्याळ’ गायब ; पुणे जिल्ह्यात दोनच ठिकाणी उमेदवार रिंगणात

शिंदे म्हणाले, "पहिल्या वेळी तुम्ही परिवाराच्या नावाने निवडून येता. त्यानंतर मात्र तुम्हाला स्वत:ला सिद्ध करावं लागतं. मला वाटतं की हे युवराज (आदित्य ठाकरे) हे जिथे निवडून आले, त्या ठिकाणी स्पर्धा नव्हती. तिथे त्यांना स्वत:च्या दोन आमदारांना घरी बसवलं. त्यानंतर युवराज यांचं पॅरॅशूट लँडिंग केलं गेलं. त्यांनतर त्यांना तिथून निवडून आणलं, असा शब्दात शिंदेंना ठाकरेंवर (Aditya Thackeray) निशाणा साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com