Rajan Salvi, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Rajan Salvi : नोटिसीनंतर उद्धव ठाकरेंशी चर्चा; राजन साळवींची भूमिका ठरली!

Rajan Salvi News : शिवेसना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना एनसीबीची नोटीस आली आहे

सरकारनामा ब्यूरो

रत्नागिरी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे राजापूरचे आमदार आणि उपनेते राजन साळवी लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आले आहे. साळवींना शनिवारी रायगड लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाकडून मालमत्तेच्या चौकशी संदर्भात नोटीस बजावण्यात आली. यामध्ये सोमवारी (5 डिसेंबर) रोजी मालमत्ता चौकशीसाठी सर्व कागदपत्र घेऊन हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

या नोटिसीनंतर साळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी साळवी म्हणाले, निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करत आहे. त्यामुळेच मला एससीबीची नोटीस प्राप्त झाली. देशात, राज्यात एकाच पक्षाचे सरकार, त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमामतून दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. भ्रष्टाराचे आरोप, बेहिशेबी मालमत्ता, असे आरोप भाजपमध्ये (BJP) गेल्यानंतर स्वच्छ होतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

या वेळी साळवी म्हणाले, होय मी श्रीमंत आहे, बाळासाहेब ठाकरेंनी माझ्या पाठीवर थाप मारली ही माझी श्रीमंतीच आहे. शिवसैनिक हीच माझी संपत्ती आहे. मला धमकी देण्याचा प्रयत्न करू नये, जनतेच्या हितासाठी तुरुंगवास भोगला आहे. मी निर्दोष आणि स्वच्छ आहे, असल्याचे त्यांनी सांगितले. चौकशीची नोटीस आली आहे, मी चौकशीला सामोरे जाणार असल्याचही त्यांनी सांगितले.

नोटीस आली, तुरुंगात गेलो तरीही आपण शिवसेनेतच (Shiv Sena) राहणार असल्याचे साळवी यांनी स्पष्ट केले. हिंमत असेल तर मला जेल मध्ये टाकून दाखवा, संपुर्ण शिवसेना माझ्या पाठिशी, असल्याचा इशारा त्यांनी दिला. जेलमध्ये गेलो तरी बेहत्तर, मात्र, उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवरही त्यांनी पडदा डाकला. मी शिंदे गटात जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. माझा न्यायव्यस्थेवर विश्वास आहे.

नोटीस आल्यानंतर आपण उद्धव ठाकरे यांच्याशीही बोललो असल्याचे साळवी यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की राजन तुझ्या पाठीशी शिवसेना आहे, निश्चिंत रहा. तुरुंगामध्ये जाईन पण मरेपर्यंत पायाशी जाणार नाही, मरेपर्यंत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा शिवसैनिक राहणार असेही साळवी यांनी यावेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT