Ratan Tata Sarkarnama
मुंबई

Ratan Tata Maharashtra Udyog Ratna Award : रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला 'उद्योगरत्न पुरस्कार' जाहीर

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : टाटा समूहाचे सर्वेसर्वा, उद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत याबाबत माहिती दिली. राज्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांवर चर्चा करताना उदय सामंत यांनी या पुरस्काराबाबत माहिती दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यात हा निर्णय घेण्यात आला. या वर्षापासून महाराष्ट्र सरकारने 'उद्योगरत्न पुरस्कार' देण्याचा निर्णय घेतला आहे.

हा पुरस्कार राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या धर्तीवर अपेक्षित आहे. हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार असेल. राज्यातील होतकरू महिला, तरुण उद्योजकांसाठीही पुरस्कार असतील, असेही सामंत म्हणाले.

  • रतन टाटा हे टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आहेत.

  • रतन टाटा हे त्यांच्या साधेपणासाठीही प्रसिद्ध आहेत.

  • टाटा ग्रुप भारतातील सर्वात जुना आणि सर्वात मोठ्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक आहे.

  • देशाला पुढे नेण्यात रतन टाटा यांचा मोठा वाटा आहे.

  • टाटा समूहाची मोठी भरभराट रतन टाटा यांनी आपल्या कारकिर्दीत करून दाखवली.

  • ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून मानद डॉक्टरेट आहे.

  • 2000 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT