Sana Malik meet DCM Ajit Pawar : नवाब मलिकांची मुलगी अजितदादांना भेटणार ; मतदारसंघातील कामाचा आढावा घेणार

NCP News : मागील दीड वर्षे ते कारागृहात आहेत. सध्या एका खासगी रुग्णालयात ते उपचार घेत आहेत.
Sana Malik Sheikh
Sana Malik Sheikh Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सध्या ईडीच्या अटकेत असलेले नवाब मलिक हे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे राहणार की अजित पवार गटाकडे राहणार ? याबाबत अजूनही तर्कवितर्क लढविले जात आहेत.

अजितदादांच्या बंडाला महिना होत आला तरीही नवाब मलिक किंवा त्यांच्या कुटुंबियांनी कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही, परंतु राष्ट्रवादी भाजप सोबत सत्तेत जाताना वाटाघाटी झाल्याचे बोललं जात आहे. त्यानंतर मलिक हे तुरुंगातून बाहेर येतील असेही बोललं गेले. त्यात काही दिवसापूर्वी मलिकांचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला.

Sana Malik Sheikh
MLA Vishwanath Bhoir ON Sports Complexes : क्रीडा संकुलासाठी भोईर 'मैदानात' ; शिंदेंच्याच आमदाराने केली 'नगरविकास' ची तक्रार

या घटनेनंतर नवाब मलिक हे शरद पवारांकडेच राहतील, अशी शक्यता वर्तवली गेली. पण मलिक नसताना त्यांची राजकीय जबाबदारी पार पाडणाऱ्या त्यांची मुलगी सना यांनी उघडपणे काहीच बोलून दाखवले नाही, त्यामुळे मलिकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह आहे. अशा परिस्थितीत अधिवेशनात सना मलिक या उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेणार असल्याचे समजते. मतदार संघातील कामासाठी ही भेट घेणार असल्याचे समजते.

Sana Malik Sheikh
Satej Patil IN Legislative Council : कोल्हापुरकरांची चिंता वाढली..; सतेज पाटलांच्या मागणीवर फडणवीस उत्तर देणार..

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिकांचा तात्पुरता वैद्यकीय जामीन अर्ज नामंजूर केला आहे.

मलिक यांना किडनीचा आजार असून त्यांची एक किडनी निकामी झाली आहे, जर योग्य ते उपाय नाही केले तर अधिक त्रास होऊ शकतो, असा दावा मलिक यांच्या वतीने करण्यात आला आहे. दाऊद इब्राहिमच्या हस्तकांमार्फत तीस वर्षापूर्वी धमकावून जमीन खरेदी केल्याचा आरोप ईडीने मलिक यांच्यावर ठेवला आहे. मागील दीड वर्षे ते कारागृहात आहेत. सध्या एका खासगी रुग्णालयात ते उपचार घेत आहेत.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com