Tax Department Raid sarkarnama
मुंबई

Tax Department Raid : फटाका व्यापाऱ्यावर आयकर विभागाची धाड,दुकाने व गोडाऊन सील! कोट्यावधीची उलाढाल?

Wada Dilip Traders : आज सकाळच्या सुमारास वाडा शहरातील देसाई फाट्याजवळ असलेल्या दिलीप ट्रेडर्स नावाचे दुकान असून येथे धाड पडली असून चौकशी सुरू केली आहे

सरकारनामा ब्यूरो

दिलीप पाटील

Wada News : पालघर जिल्ह्यातील वाडा शहरातील नावलौकिक असलेल्या व करोडोंचा व्यवसाय करणाऱ्या दिलीप ट्रेडर्स या फटाका व्यापाऱ्यांवर आज सकाळी धाड पडली असून त्यांची दुकाने व गोडाऊन सील केली आहेत. या धाडसत्रामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

वाडा शहरात दिलीप ट्रेडर्स नावाचे फटाका व्यावसायिक असून येथे वर्षभर फटाक्यांची विक्री होत असते. दिवाळीच्या सणात तर हे दुकान रात्र दिवस सुरू असते. करोडोंची उलाढाल दिवाळी सणात होते. वाडा येथील फटाका बाजारपेठेत फटाका घेण्यासाठी ठाणे, पालघर, नाशिक, मुंबई आदी भागातून व्यापारी येत असतात .

आज सकाळच्या सुमारास देसई फाट्याजवळ असलेल्या दिलीप ट्रेडर्स नावाचे दुकान असून येथे धाड पडली असून चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, कोणत्या कार्यालयाकडून ही धाड पडली आहे असे संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.

अचनाक धाड का?

फटाका व्यावसायिकावर धाडीच्या टायमिंगवरून सध्या वाडामध्ये चर्चा सुरू आहे. ही धाड नेमक्या कोणत्या विभागाकडून टाकण्यात आली याची माहिती देखील संबंधित अधिकारी देत नाहीत. त्यामुळे या धाडीत काय सापडणार याची देखील जोरादार चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT