viral video : काँग्रेस नेत्याचा ‘धुरंधर’च्या गाण्यावर स्वॅग, हातात पिस्तूल अन् पेटलं राजकारण

congress mla MY patil controversy : कर्नाटकातील काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले असतानाच लग्नसमारंभात पिस्तूल घेऊन नृत्य करताना काँग्रेस नेत्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Karnataka Congress leader Mateen Patel viral video
Karnataka Congress leader Mateen Patel viral video sarkarnama
Published on
Updated on
  1. कर्नाटक काँग्रेसचे नेते मतीन पटेल यांचा लग्न समारंभातील बंदूक हातात घेऊन नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  2. ते अफझलपूरचे काँग्रेस आमदार एम.वाय. पाटील यांचे निकटवर्तीय असल्याने या प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे.

  3. खासगी कार्यक्रमात शस्त्रांचे उघड प्रदर्शन केल्यामुळे नैतिकता आणि कायदेशीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Bangaluru News : कर्नाटकातील एका व्हायरल व्हिडिओमुळे काँग्रेस पक्षात नवीन वाद निर्माण झाला आहे. अफजलपूरचे काँग्रेस आमदार एम. वाय. पाटील यांचे निकटवर्तीय एका लग्न समारंभात बंदूक हातात घेऊन नाचताना दिसत आहेत. बॉलिवूड चित्रपट ‘धुरंधर’च्या गाण्यावर त्यांनी ठेका धरला असून आता याच व्हिडिओमुळे ते अडचणीत आले आहेत. तर प्रकरणाची दखल घेत गुलबर्गा पोलिसांनी चौकशी सुरू केल्याची माहिती पोलिस आयुक्त शरणप्पा एस. डी. यांनी दिली आहे.

गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपूरचे काँग्रेस आमदार एम. वाय. पाटील यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेस नेते मतीन पटेल यांनी लग्नसमारंभात हातात पिस्तूल घेऊन नृत्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बॉलिवूड चित्रपट ‘धुरंधर’च्या गाण्यावर त्यांनी बंदूक हातात घेऊन मंचावर नृत्य केल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटले असून पोलिस तपास करत आहेत. तर या प्रकरणावरून विरोधकांनी काँग्रेसविरोधात टीकेची झोड उठवली आहे.

आता या प्रकरणात गुलबर्गा पोलिसांनी चौकशी सुरू केली असून पोलिस आयुक्त शरणप्पा एस. डी. यांनी सांगितले की, व्हिडिओमधील व्यक्तीची ओळख पटवण्यात आली आहे. हा प्रकार नेमका कुठे घडला आणि कोणत्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो, याची माहिती घेतली जात आहे. दरम्यन बंदूक खरी होती की खोटी (बनावट), त्याचा परवाना आहे की नाही यासह अटींचे उल्लंघन झाले आहे का? याचा तपास सुरू आहे. तापासाअंती या प्रकरणात व्हिडिओमधील व्यक्ती दोषी आढळल्यास शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे.

Karnataka Congress leader Mateen Patel viral video
Congress Vs BJP : 'अशोक चव्हाण खुर्चीत, नगराध्यक्ष उभे...'; काँग्रेस प्रवक्त्याने 'चव्हाण', 'देशमुख' पॅटर्नमधील फरक सांगितला

तर या वादावर आता काँग्रेस आमदार एम. वाय. पाटील यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेस नेते मतीन पटेल यांनी खुलासा करताना आपली बाजू मांडली आहे. त्यांनी, कलबुर्गी येथील एका रिसॉर्टमध्ये कौटुंबिक कार्यक्रम होता. मोठ्या बहिणीच्या मुलीचा कार्यक्रम होता. आमच्या कुटुंबातील सदस्यही तिथे होते. जिथे धुरंदर चित्रपटात गाण्यावर नृत्य करण्याचा हट्ट कुटुंबातील सदस्यांनी केला होता. त्यांच्या या हट्टापायी मी सजावट म्हणून वापरली जाणारी खेळणे (बंदूक) हातात घेवून नृत्य केलं.

पोलिस विभागानेही चौकशी करून अहवाल सादर केला असून ती खरी बंदूक नसून या घटनेला आता राजकीय रंग दिला जात असल्याचा दावा करताना विरोधकांवर त्यांनी आरोप केला आहे. या घटनेमुळे राजकीय वाद निर्माण झाला असून सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने सार्वजनिक कार्यक्रमात बंदुकीसारखी वस्तू नाचवल्याने आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Karnataka Congress leader Mateen Patel viral video
Pune Congress : ज्या जिल्हा परिषदेत 38 वर्ष सत्तेत तिथेच काँग्रेसचं पानिपत : एकही जागा जिंकता आली नाही!

FAQs :

1. व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?
मतीन पटेल हे लग्न समारंभात बंदूक हातात घेऊन गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

2. मतीन पटेल कोण आहेत?
ते कर्नाटक काँग्रेसचे नेते आणि माजी जिल्हा पंचायत सदस्य आहेत.

3. या प्रकरणात राजकीय संदर्भ काय आहे?
ते अफझलपूरचे काँग्रेस आमदार एम.वाय. पाटील यांचे जवळचे सहकारी आहेत.

4. वाद का निर्माण झाला?
खासगी कार्यक्रमात शस्त्रांचे उघड प्रदर्शन केल्यामुळे कायदेशीर आणि नैतिक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

5. पुढे काय होऊ शकते?
या प्रकरणावर पक्ष किंवा प्रशासनाकडून स्पष्टीकरण किंवा कारवाई होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com