Gulabrao Patil, Dada Bhuse sarkarnama
मुंबई

गुलाबराव पाटील ठाकरेंना झोडत असताना इकडे भुसेंना अश्रू आवरत नव्हते...

गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिंदे गटाच्या आमदारांची भूमिका मांडली

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : 'आम्ही सत्ता सोडून गेलो तरी आमचे मन कसे कळाले नाही'. 'तुमची माणसे दूर गेली नाहीत, त्यांना दूर लोटले गेले आहे', आमचा बंड नाही, हिंदुत्वाशी फारकत घेऊ नये म्हणून आम्ही उठाव केला, अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी (Gulabrao Patil) सभागृह दणाणून सोडले. गुलाबराव पाटील बोलत असतानाच त्यांच्या मागे बसलेल्या दादा भुसे (Dada Bhuse) यांना आपल्या भावना अनावर झाल्या.

शिवसेनेचे (ShivSena) बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी बहुमताच्या चाचणीनंतर सभागृहात बोलताना मौन सोडले. गुलाबराव पाटील बोलत असताना दादा भुसे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. गुलाबराव यांच्या पाठिमागे भुसे बसलेले असल्यामुळे सभागृहातील कॅमेऱ्यांनी ते दृष्य टिपले. शिवसेनेचे आमदार गुवाहाटीला गेल्यानंतर त्यांच्यावर राज्यभरात मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्या टीकेला पाटील यांनी उत्तर दिले. पाटील यांनी शिंदे गटाच्या सगळ्याच आमदारांची भूमिका जोरदार पणे मांडली. राज्यात झालेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. आपल्या मनातील भावना पाटील यांनी मांडल्या असेच भुसे यांना वाटले. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आले.

दादा भुसे हे पाटील यांच्या मागे बसलेले होते. भुसे यांच्या शेजारी संदीपान भुमरे बसलेले होते. पाटील यांचे भाषण सुरु असताना त्यावर शिंदे गटाचे आमदार बाक वाजवून त्यांना साथ देत होते. मात्र, भुसे यांच्या डोळ्यात पाणी होते. ठाकरेंना सोडावे लागत आहे यांचे दु:ख पाटील यांनी आपल्या भाषणात मांडले. त्यावेळी भुसे यांना आपले अश्रु आवरता आले नाही. यावेळी पाटील यांनी कधी आक्रमक होऊन तर कधी आपल्या शायरीतून त्यांनी शिवसेनेला खोचक टोले लगावले. पाटील म्हणाले, बाळासाहेबांनी टपरीवाल्यांना, रिक्षावाल्यांना आमदार केले. बाळासाहेबांच्या विचारांशी प्रेरित होऊनच आम्ही शिवसेना सोडली. जनतेचे काम करण्यासाठी सत्ता हवी असे बाळासाहेब सांगायचे. मात्र, आमच्यावर टीका केली. आम्ही बंड नाही, उठाव केला. सत्तेचे केंद्रीकरण बाळासाहेबांनी केले आहे. हिंदुत्वाचा रक्षण करणारा पक्ष म्हणजे शिवसेना, जे मिळाले ते बाबासाहेबांच्या आशीर्वादाने असेही ते यावेळी म्हणाले.

साधा मेंबर जरी फुटला तरी मन विचलित होते, मात्र इथे चाळीस आमदार फुटतात तेव्हा तुम्ही काय करताय, असा रोखठोक सवाल त्यांनी केला. ४० आमदार फुटत आहेत, हि काही आजची आग नाही, आम्हाला आमचे घर सोडणे, अजिबात पटत नाही, बाळासाहेबांना दुःख देण्याचा, कुणाला दुःख देण्याची इच्छा नाही. मात्र, हे करावे लागले आहे. शिंदे यांच्या सारख्या नेतृत्वांना पुढे आणले, बाळासाहेब बोलले होते. एक दिवशी तुम्ही आमदार व्हाल, बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही आमदार झालो आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT