'आमच्या सारखचं मोदींनाही चहावाला म्हणून हिणवलं गेल मात्र तो पक्ष आता संपत चाललायं'

Eknath Shinde|Shivsena| BJP : शिंदे-भाजप सरकारने आज बहुमताचा प्रस्ताव 164 मते मिळवत विजय मिळवला आहे.
Eknath Shinde Latest News
Eknath Shinde Latest News Sarkarnama

Eknath Shinde : शिंदे-भाजप सरकारने आज बहुमताचा (Floor test in Maharashtra) प्रस्ताव 164 मते मिळवत विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) केवळ 99 मते मिळाली.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतील आपली जडणघडण आणि आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला. याबरोबरच खुमासदार भाषण करत जोरदार फटकेबाजी करत बंडखोर आमदारांवर आणि त्यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.

Eknath Shinde Latest News
उद्धव ठाकरेंचे भाजपला थेट आव्हान; हिंमत असेल, तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा!

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यावर आणि सोबत आलेल्या आमदारांवर करण्यात आलेल्या टीकेला सडेतोड उत्तर देत हिशोब चुकता केला. शिंदे म्हणाले, आम्ही बंड केल्यानंतर आमचा बाप काढला गेला, आमची लायकी काढली गेली, भाजीवाला, रिक्षावाला, पानटपरीवाला म्हणून आम्हाला हिणवलं गेलं मात्र अरे..आम्ही शिवसेना उभी करण्यासाठी झटलो. पोटासाठी आपले व्यवसाय करून बाळासाहेबांसोबत सैनिक म्हणून आम्ही उभे राहिलो. भाजीवाला असो रिक्षावाला छोटा व्यवसाय करणे हे काही पाप नाही, हे तरी त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे होते, अश्या शब्दात त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

Eknath Shinde Latest News
गोपीनाथ मुंडेंच्या सांगण्यावरून मी धनंजय मुंडेंनाही मतं दिलंय : ठाकूरांनी सांगितले गुपीत

पुढे बोलतांना शिंदे म्हणाले की, आमच्यासारखीच टीका ही देशाचे पंतप्रधान मोंदीजी यांच्यावर देखील करण्यात आली. त्यांनाही लोकांनी चहावाला म्हणून हिणवलं गेलं पण हिणवणारांचा पक्ष आज संपत चाललाय. आता आहे का त्यांचा पक्ष शिल्लक?, असा जोरदार टोला त्यांनी कॅाग्रेसला लगावला. यानंतर त्यांनी पंतप्रधान म्हणून मोदींनी केलेल्या कामाची स्तुती केली आणि त्यांनी आपल्याला चांगले काम करण्याच्या शुभेच्छा दिल्याचीही सभागृहाला माहिती दिली. ते म्हणाले, मोदीजी यांनी आपल्या देशाचा मान वाढवला आहे. याबरोबरच त्यांचा आणि आमचा अजेंडाही एकच आहे. बाळासाहेब म्हणायचे की, मला एकदा पंतप्रधान करा मी 370 कलम हटवतो. मात्र ही कलम अमित शहा आणि मोदीजींनी हटवून दाखवली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना हे नैसर्गिक मित्र असल्याची शिंदे यांनी आठवण करून दिली.

Eknath Shinde Latest News
जेवण तयार ठेवलं होतं! बंडखोर आमदार पहिल्यांदाच थेट आदित्य ठाकरेंसमोर आले अन्...

दरम्यान, शिंदे यांनी आज केलेल्या भाषणात चौफेर फटकेबाजी केली. त्यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर केले. याबरोबरच राज्यातील जनतेच्या विकास कामासाठी आपण कटीबद्ध राहणार असून आमदारांनी विकास कामांसाठी थेट फोन करा आपण कामे करू, असे सत्ताधारी आमदारांसह विरोधी पक्षातील आमदारांनाही आवाहन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com