TET exam sarkarnama
मुंबई

TET Exam Cancelled : TET चा पेपर फुटला! उद्या होणारी परीक्षा रद्द; 24 तास आधीच लाखो परीक्षार्थ्यांना धक्का

TET Exam Cancelled: देशात NEET परीक्षेनंतर पुन्हा एकदा महत्वाच्या परीक्षेचा पेपर फुटल्यानं लोकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

Amit Ujagare

TET Exam Cancelled : शिक्षकांसाठीची पात्रता परीक्षा असलेली टीईटीची उद्या होणाऱ्या परीक्षेचा पेपर फुटला आहे. त्यामुळं ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त, प्रिया शिंदे पाटील यांनी या पेपरफुटीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसंच परिषदेकडून यासंदर्भात अधिकृत निवेदनाचं पत्रही प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

देशात NEET परीक्षेनंतर पुन्हा एकदा महत्वाच्या परीक्षेचा पेपर फुटल्यानं लोकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. टीईटीच्या परीक्षेला यंदा 6 लाख परीक्षार्थी बसले होते. यात पुण्यातून सर्वाधिक 45 हजार 562 परीक्षार्थी आहेत. राज्यातील 1,728 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार होती.

भिवंडीतून पेपर फुटला

उद्या रविवार, २८ जून २०२६ रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर हा ठाणे जिल्ह्यातील भिवंडी इथून फुटला असून तो नेमका कोणत्या यंत्रणेद्वारे फुटला हे अद्याप कळू शकलेलं नाही. भिवंडी पोलिसांत याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पेपर फुटल्याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती देखील मिळते आहे. त्याचबरोबर हे पेपर त्यांच्याकडं कुठून आले? कुठल्या यंत्रणेमार्फत हा पेपर समोर आला आहे? याची प्राथमिक चौकशी सध्या पोलीस करत आहेत.

पेपरची होत होती विक्री

पोलिसांना आपल्या खबऱ्यांकडून या पेपरफुटीची माहिती मिळाली होती की, टीईटीच्या परीक्षेचा पेपरची सध्या विक्री सुरु आहे. अनेकांकडून या पेपरसाठी पैसे दिले जात आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून हा फुटलेला पेपरही मिळवला आहे. त्यानुसार, पुढे शिक्षण विभागाकडून ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पेपर तपासणीत झाला होता घोटाळा

यापूर्वी देखील ही परीक्षा झाली होती तेव्हा त्याच्या तपासणीमध्ये मोठा घोटाळा झाला होता. अनेकांना अवाजवी पद्धतीनं कितीही मार्क्स वाढवून देण्यात आले होते. त्यामुळं या परीक्षेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आलेला असतानाच आता बऱ्याच काळानंतर होत असलेल्या याच परीक्षेचा पेपर फुटल्यानं शिक्षकांमध्ये आणि नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT