Uddhav Thackeray | Tejasvi Ghosalkar  Sarkarnama
मुंबई

Maharashtra politics : ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच शिंदेंनी डाव साधला; तेजस्विनी घोसाळकर मोठा धक्का देण्याच्या तयारीत?

BMC Election update : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. घोसाळकर शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यात आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होणार आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यांचे महायुतीमध्ये इनकमिंग होताना दिसत आहे.

त्यातच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटातील सक्रिय नेत्या व माजी नगरसेविका तेजस्वीनी घोसाळकर एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे त्यासर्व घडामोडीकडे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्या शिवसेनेच्या नेत्या व माजी नगरसेविका तेजस्वीनी घोसाळकर या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. येत्या काळात घोसाळकर या शिंदे गटात प्रवेश करणार असून त्यांच्या पक्षाकडून मुंबई महापालिकेची निवडणूक लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या काळात त्या काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय असलेल्या तेजस्वीनी घोसाळकर यांचा प्रभाग क्रमांक एक हा ओबीसी महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या हक्काच्या वार्डात निवडणूक लढविता येणार नाही. त्यामुळे त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच घोसाळकर यांनी साथ सोडल्यास उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर तेजस्वीनी घोसाळकर या उद्धव ठाकरेंची साथ सोडून येत्या काळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनकडून निवडणूक लढण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली आहे.

विशेषतः येत्या काळात त्या शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्व घडमोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT