नवी दिल्ली : माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya)आणि भाजपच्या शिष्टमंडळाने (BJP Delegation) आज सकाळी केंद्रीय गृहसचिव अजय कुमार (Ajay Kumar) भल्ला यांची भेट घेतली. या भेटीत सोमय्यांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीबाबतची माहिती गृहसचिवांना दिली आहे.
किरीट सोमय्या म्हणाले,''गृहसचिवांना राज्यातील ठाकरे सरकारच्या (Uddhav Thackeray) मनमानी कारभाराची माहिती दिली आहे. याबाबत गृहसचिवांनी चिंता व्यक्त केली आहे. येत्या दोन दिवसात केंद्रीय गृहमंत्रालय या प्रकरणाची गंभीर दखल घेणार आहे.ठाकरे सरकारची चैाकशी करण्यासाठी गृहसचिवांकडून लवकरच महाराष्ट्रात पथक पाठविण्यात येणार आहे,''
सोमय्या म्हणाले,''ठाकरे सरकार आपल्या अधिकारांचा गैरवापर करीत आहेत. माझ्या विरोधात खोटी तक्रार पोलीसांकडे केली आहे. मी न केलेली तक्रारही माझ्या नावाने ठाकरे सरकारनं खपवली आहे. ,''
अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना भेटण्यासाठी सोमय्या गेले होते. खार पोलीस स्टेशनमधून बाहेर येत असताना त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.बूट आणि पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आल्या. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमय्या खार पोलीस स्टेशनमधून बाहेर पडत असताना अनेक लोक मोबाईल आणि कॅमेऱ्यातून व्हिडिओ बनवत होते. सोशल मीडियावरही अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पोलीस या सर्व व्हिडिओंचा तपास करत आहेत. जेणेकरून किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांची ओळख पटू शकेल.
पोलीस आयुक्त संजय पांडेंवर गंभीर आरोप
''माझ्यावर हल्ला झाला त्यांचे सीसीटीव्ही फुटेज मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी गायब केले आहेत. पुण्यात माझ्यावर झालेल्या हल्ल्यांचेही सीसीटीव्हीचे फुटेजही पुणे पोलिसांनी गायब केले आहेत,''असा आरोप सोमय्यांनी माध्यमांशी बोलताना केला. संजय पांडे यांची खातेनिहाय चैाकशी करण्यात यावी,''अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.