मुंबई : हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाचण्यावरुन गेले दोन दिवस मातोश्री निवासस्थानासमोर आणि खार येथे राणा दाम्पत्याच्या निवासस्थानासमोर राडा झाला. 'तू मातोश्रीवर येऊन दाखवच,असं आव्हान देणारी आजी चर्चेत आली. या आजींला भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपल्या परिवारासह काल आजींच्या घरी गेले होते. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुख्यमंत्री ठाकरेंना टोला लगावला आहे.
मनसेचे (mns) सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी टि्वट करीत मुख्यमंत्र्यांना चिमटा घेतला आहे. ''त्या आजींचा सत्कार केला पाहिजे त्यांच्या निमित्ताने का होईना घराबाहेर तर पडले. धन्यवाद आजी,''अशा शब्दात संदीप देशपांडेंन आजींला धन्यवाद देत मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली आहे.
शिवडी येथे राहणाऱ्या आणि मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेशी जोडल्या गेलेल्या चंद्रभागा शिंदे (Chandrabhaga Shinde) या ९२ वर्षीय आजी शनिवारी तळपत्या उन्हात मातोश्रीबाहेर थांबून राणा दाम्पत्याला विरोध करीत घोषणा देत होत्या. त्यानंतर त्यांना मातोश्रीवर बोलविण्यात आले. काल (रविवार) मुख्यमंत्री ठाकरे हे आपल्या परिवारासह त्या आजींला भेटण्यासाठी तिच्या घरी गेले होते. यावेळी मुख्यमंत्र्याच्या पत्नी रश्मी ठाकरे, राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लता मंगेशकर विशेष पुरस्कार स्वीकारण्यासाठी रविवारी मुंबईत आले होते. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या वेळेतच मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रभागाबाई शिंदे यांची भेट घेतली. पुरस्काराच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवत ठाकरेंनी हा भेटीचा कार्यक्रम का घडवून आणला असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सायंकाळी शिंदे यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मुख्यमंत्री त्या आजीच्या कुटुंबियांशी संवाद करत असतानाच दुसरीकडे मुंबईतीलच षण्मुखानंद सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान केला जात होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.