Sanjay Raut Criticizes Girish Mahajan over Badlapur Rape Case Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut: गिरीश महाजन यांचं डोकं फिरलंय; संजय राऊत संतापले

सरकारनामा ब्यूरो

बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचे पडसाद उमटत असून सत्ताधारी आणि विरोधकांचे यावरुन राजकारण सुरु आहे. बदलापूर येथे मंगळवारी झालेल्या आंदोलनानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षांवर टीका केली.

आंदोलनात राजकीय पक्षाचा हात असल्याचे आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या आरोपावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटातील नेते, खासदार संजय राऊत यांनी महाजन यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला आहे.

"गिरीश महाजन यांचे डोके फिरलेले आहे. गिरीश महाजन असेही म्हणतील ज्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला त्या मुलीसुद्धा मॅनेज झाल्या आहेत. पण यात विरोधकांचा संबंध काय? असा संतप्त सवाल राऊतांनी उपस्थित केला.

बदलापूरमध्ये जी घटना घडली ती शाळा भाजपशी संबंधीत आहे, दुदैवाने या शाळेचा दुसऱ्या पक्षांशी संबध असता तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे महिला मंडळ त्या शाळेच्या पायरीवर ठिय्या देऊन बसले असते. आता का गेले नाही, असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला.

गिरीश महाजन यांनी अशा विषयात राजकारण करु नये. यात विरोधकांचा काय संबंध, त्या मुली किती लहान आहेत. पोलीस तक्रार नोंदवून घेत नव्हते, पोलिसांवर दबाव येत होता, त्यावर तुम्ही का बोलत नाही?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

अशा घटनेवरुन उत्तर प्रदेशात भाजपने बुलडोझर चालवले असते. आता असे बुलडोझर बदलापूरला का गेले नाही, कलकत्ता येथे घडलेल्या घटनेची दखल न्यायालयाने घेतली, बदलापूरमध्येही जनतेचा उद्रेक मोठ्या प्रमाणात आहे, मग त्याची दखल न्यायालयाने का घेतली नाही, असा खडा सवाल राऊतांनी उपस्थित केला. हे सरकार संवेदनाहीन सरकार आहे, असे राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT