Samarjit Ghatge: समरजित घाटगे फडणवीसांची साथ सोडणार? मुश्रीफांच्या घरासमोरच 'तुतारी' फुंकणार

Samarjit Ghatge will join Sharad Pawar group:येत्या तीन सप्टेंबरलाच पालकमंत्री मुश्रीफ यांच्या घरासमोर असणाऱ्या गैबी चौकात घाटगे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थिती पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
Samarjit Ghatge will join Sharad Pawar group
Samarjit Ghatge will join Sharad Pawar groupSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना गुरुस्थानी मानून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा पराभव करून विजय मिळवणार असा विडा उललेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे (Samarjit Ghatge) हे लवकरच पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना हा धक्का समजाला जातो. घाटगे हे लवकरच भाजपला रामराम करत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. येत्या तीन सप्टेंबरलाच पालकमंत्री मुश्रीफ यांच्या घरासमोर असणाऱ्या गैबी चौकात त्यांच्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थिती पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीकडून कागल मतदार संघातून राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार हसन मुश्रीफ असल्याने समरजीत सिंह घाटगे यांची नाराजी आहे. विधानसभा निवडणुकीत हे दोघेही एकमेकांविरोधात असल्याने घाटगे हे अपक्ष किंवा राष्ट्रवादीत शरद पवार गटात प्रवेश करून मुश्रीफ यांच्याविरोधात दंड थोपटू शकतात.

नुकतीच त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याची माहिती आहे. त्यामुळे लवकरच समरजित सिंह घाटगे शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करणार आहेत. मात्र त्यांनी अद्याप याबाबत ठोस भूमिका जाहीर केलेली नाही.

Samarjit Ghatge will join Sharad Pawar group
Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांना आता आदिवासींची साथ? तिसऱ्या आघाडीत सहभागी होणार

त्याबाबत निर्णय घेण्यासाठी समरजीत सिंह घाटगे लवकरच कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहे. त्यानंतर हा निर्णय ठरवला जाणार आहे. दरम्यान, कोल्हापुरात उद्या होणाऱ्या महायुतीच्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व महायुतीचे नेते उपस्थित राहणार आहेत. समरजित सिंह घाटगे उपस्थित राहणार का ? याकडे महायुतीसह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com