Sanjay Raut News : ''भाजपने ईडीची भीती दाखवून शिवसेना (Shivsena) फोडली. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांवरही ईडी कारवाईची भीती दाखवली जात आहे. शिवसेनेसोबत जो प्रयोग केला तोच राष्ट्रवादीबरोबर सुरू आहे,'' असा आरोप ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सुरू असलेल्या ईडी, सीबीआय कारवाईवरून गुरुवारी केला.
केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई आणि अटकेच्या भीतीने एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. यावर माध्यमांशी बोलताना राऊत यांनी आदित्य यांचा दावा खरा असल्याचे सांगितले. तसेच, एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासमवेत गेलेल्या लोकांवर जो प्रयोग केला गेला तसाच प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेससोबत सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला. त्यामुळे केंद्रीय यंत्रणांचा वापर करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा इशारा राऊत यांनी दिला.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतल्या बंडानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. आदित्य ठाकरे बुधवारी हैद्राबाद दौऱ्यावर होते. येथे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक गौप्यस्फोट केला होता.
आदित्य ठाकरे म्हणाले, जेलमध्ये जाण्याच्या भीतीने एकनाथ शिंदे भाजपसोबत गेल्याचा दावा आदित्य यांनी केला होता. भाजममध्ये (BJP) गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील, असे शिंदे म्हणाले होते, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते, असे ही आदित्य ठाकरे म्हणाले होते. आदित्य ठाकरे यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
शिंदे गटातील नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आदित्य ठाकरेंना उत्तर दिले होते. शिंदे म्हणाले होते, ''अरे त्या जाऊ द्या रे... आदित्यचा विषय तो लहान आहे अजून,'' असे सांगत मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात विषय संपवला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.