Ravikant Tupkar News : ...तर रविकांत तुपकर खासदार प्रतापराव जाधवांना चितपट करतील; आघाडी वज्रमुठ आवळणार?

Shivsena News : वऱ्हाडात बुलडाणा जिल्हा सर्वात मोठा आहे.
Ravikant Tupkar, Prataprao Jadhav News
Ravikant Tupkar, Prataprao Jadhav NewsSarkarnama
Published on
Updated on

Buldhana Lok Sabha Constituency : वऱ्हाडात बुलडाणा जिल्हा सर्वात मोठा आहे. येथील राजकारणही भारी आहे. सन २००९ पासून पूर्वीच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव (सध्या एकनाथ शिंदे गट) खासदार आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सोडून एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. पण भाजपने (BJP) मतदारसंघात तयारी सुरु केली आहे.

२००४ मध्ये प्रतापराव जाधव यांच्या तीन टर्म पूर्ण होत आहेत. पुढील वर्षी ते चौथ्यांदा नशीब आजमावणार आहेत. जसे ते उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले, तसे खासदारकीसाठी ते एकनाथ शिंदे गट सोडून भाजपमध्येही जाऊ शकतात, असा एक कयास लावला जातो. भाजपने स्वतःचा उमेदवार देण्याची तयारी केल्यास जाधव भाजपमध्ये जाऊन उमेदवारी मिळवतील, हे निश्‍चित मानले जात आहे.

Ravikant Tupkar, Prataprao Jadhav News
Akola Lok Sabha : अकोल्यासाठी ठाकरे-आंबेडकरांनी जुळवलेले गणित; पवारांच्या गुगलीमुळे फिस्कटले?

उपरोक्त गणित जुळले तर भाजप-शिंदे गटाचे प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) आणि महाविकास आघाडी असा थेट सामना बुलडाणा लोकसभा मतदारसंघात होणार. मात्र, यामध्ये भाजपच्या चिखलीच्या आमदार श्‍वेता महाले यासुद्धा लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असल्याची माहिती आहे. तशी फिल्डींगही त्यांनी लावल्याचे सूत्र सांगतात. असे झाले तर जाधवांसमोर मोठी अडचण उभी ठाकू शकते. केवळ एकट्या शिंदे गटाच्या भरवशावर बुलडाण्याचा 'घाट' सर करणे अवघड आहे. त्यामुळे जाधव काहीही आटापिटा करतील, पण शिंदे गट-भाजपकडूनच उमेदवारी मिळवतील.

रविकांत तुपकर उतरणार मैदानात..

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर लोकसभेच्या निवडणुकीत उतरणार हे निश्‍चित आहे. महाविकास आघाडीने येथे उमेदवार न देता तुपकरांना मदत केली तर प्रतापरावांना टक्कर देऊन निवडून येण्याची त्यांची क्षमता आहे. किंबहुना महाविकास आघीडीचेच ते अधिकृत उमेदवार असले तर तुपकर चांगली लढत देतील. अशा परिस्थितीत हा सामना तुल्यबळ होणार आहे. पण जर का रविकांत तुपकर यांना पाठिंबा न देता महाविकास आघाडीने आपला उमेदवार दिला तर प्रतापराव जाधव सहज निवडून येतील, असे समीकरण आहे.

Ravikant Tupkar, Prataprao Jadhav News
Nagpur News : नितीन गडकरी बिनधास्त पण नाना पटोलेंचे असणार कडवे आव्हान; असे असेल गणित!

भाजपला केंद्रात जाण्यापासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीने 'वज्रमूठ' बांधली आहे. आघाडीला भाजपचे खासदार कमी करायचे आहेत. तर दुसरीकडे २०१९ मध्ये गमावलेल्या जागा परत मिळविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. २०२४ चा मुकाबला तगडा होणार आहे. त्यामुळे बुलडाण्यात निवडून येऊ शकणाऱ्या उमेदवाराला आघाडी पाठिंबा देईल, अशी शक्यता आहे. भाजपकडून जर श्‍वेता महाले यांना उमेदवारी दिली आणि मोदी लाट कायम राहिली, तर त्यासुद्धा निवडून येतील, अशी स्थिती आहे.

महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी द्यायची झाल्यास कॉंग्रेस की राष्ट्रवादी हा प्रश्‍न उपस्थित होणार आहे. ठाकरे गटाचा फार विचार येथे होणार नाही, असे दिसते. जर जागावाटपात बुलडाणा कॉंग्रेसला मिळाले, तर हर्षवर्धन सपकाळ यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. सपकाळ २०१४ मध्ये बुलडाण्याचे आमदार होते. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या लाटेत ते निवडून आले होते. त्यामुळे कॉंग्रेस येथे जोर लावू शकते. पण निवडून येण्याची शक्यता फार कमी आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला ही जागा सुटल्यास राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांच्याशिवाय दुसरा पर्याय सध्यातरी राष्ट्रवादीकडे नाही. शिंगणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हेवीवेट नेते मानले जातात. काहीही झाले तरी लोकसभा लढणारच, असा निर्धार तुपकरांनी केलेला आहे. मतविभाजन होऊन महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागू शकतो.

Ravikant Tupkar, Prataprao Jadhav News
Bhandara-Gondia LokSabha : परंपरा सुरु राहणार की इतिहास घडणार; भाजपमध्ये अनेक इच्छुक : पटोलेंची भूमिका महत्त्वाची

जाधवांना आता भाजपचाच आधार..

मूळ शिवसेना सोडून एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्या जाधवांची अडचण होण्याची जास्त शक्यता आहे. कारण अजूनही लोक '५० खोके एकदम ओक्के', हा नारा विसरलेले नाहीत. तो प्रभाव कायम आहे. गद्दारी केल्यामुळे शिंदे गटातील नेत्यांना आता लोक पसंत करीत नाहीत. मूळ शिवसेनेपैकी केवळ १० ते १५ टक्के लोक शिंदे गटाकडे आहेत, तर उर्वरित अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे भाजप-शिंदे गट यावेळी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे. किंबहुना शिंदे गटासोबत जाण्याचे नुकसानही भाजपला सोसावे लागू शकते.

तुपकर भारी पडणार?

महाविकास आघाडी पुरस्कृत रविकांत तुपकर आणि भाजप-शिंदे गटाचे प्रतापराव जाधव अशी थेट लढत झाल्यास तुपकर भारी पडू शकतात. कारण दलित, मुस्लिम आणि अठरापगड जातीचे लोक महाविकास आघाडीला मतदान करतील. याशिवाय मराठा समाजाचा मोठा प्रभाव या मतदारसंघावर आहे. मात्र, यामध्येही दोन गट आहेत, ते म्हणजे गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा. यातील गरीब मराठा महाविकास आघाडीकडे तर श्रीमंत मराठा शिंदे-भाजप गटाकडे जाऊ शकतो, असे सांगितले जाते. असे झाले तरीही तुपकर भारी ठरतील, ही शक्यता जास्त आहे. शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनांमुळे तुपकरांनी चांगला जनाधार मिळवलेला आहे.

Ravikant Tupkar, Prataprao Jadhav News
Ramtek Lok Sabha : तुमानेंची वाट खडतर; आघाडीची ताकद अन् मतदारसंघाचा इतिहासही ठाकरेंच्या पथ्यावर पडणार...?

बुलडाणा लोकसभा मतदारसंघामध्ये दोन भाग पडतात. घाटाखाली आणि घाटावर असे दोन भाग आहेत. या दोन्ही भागांमध्ये चालेल असा उमेदवार येथे आघाडीला द्यावा लागेल. कारण, मेहकर हा खासदार जाधवांचा बालेकिल्ला आहे. त्यांच्या शेजारचा सिंदखेडराजा राष्ट्रवादी म्हणजे शिंगणेंचा बालेकिल्ला आहे. तर चिखलीमध्ये भाजपच्या श्वेता महाले आमदार आहेत. मात्र, येथे काँग्रेसचे राहुल बोंद्रे यांचीही ताकद चांगली आहे. त्याच प्रमाणे बुलडाणा, खामगाव, जळगाव जामोद हे भाग घाटावरचे आहेत. बुलडाण्यात शिंदे गटाचे संजय गायकवाड, खामगावमध्ये आकाश फुंडकर हे भाजपचे आमदार आहेत. तर जळगाव जामोदमध्ये भाजपचेच संजय कुटे आमदार आहेत.

खामगाव आणि बुलडाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि ठाकरे गटाचीही तादक आहे. त्यामुळे आघाडीला या तीनही मतदार संघात चांगली मते मिळवणारा उमेदवार हवा आहे. शेतकरी आंदोलनामुळे रविकांत तुपकर यांनी या भागात चांगली वातावरण निर्मीती केली आहे. त्यातच त्यांना जर आघाडीची ताकद मिळाली तर जाधवांसाठी ही लढाई अवघड होऊ शकते. तसेच राजेंद्र शिंगणे यांच्या रुपाने राष्ट्रवादीची मोठी ताकद जिल्ह्यात आहे, त्यांनी आपली ताकद तुपकरांच्या पारड्यात टाकली तर तुपकरांसाठी निवडणूक सोपी होईल. मात्र, आघाडीने उमेदवार दिला आणि तुपकर स्वतंत्र लढले तर मतविभाजणामुळे जाधवांसाठीही निवडणूक सोपी होईल, त्यामुळे शिंगणे, तुपकरांच्या निर्णयावर बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे भवितव्य ठरणार आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com