Sanjay Raut and Kirit Somaiya Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : संजय राऊतांनी केली किरीट सोमय्यांची मिमिक्री; म्हणाले, 'एकनाथ शिंदेंकडे हिशोब...'

Sanjay Raut On Ajit Pawar : अजित पवार एवढे निर्दयी होतील, असं वाटलं नव्हतं, खासदार संजय राऊत यांची अजित पवारांवर जोरदार टीका

Ganesh Thombare

Delhi News: "सध्या या देशात एकच कायदा आहे. पण भाजपला फक्त 'पीएमएलए' कायदाच माहीत आहे. भाजप या 'पीएमएलए' कायद्याचा गैरवापर करून विरोधकांना तुरुंगात टाकत आहे. त्यासाठी या कायद्याचा वापर करत आहे. हेमंत सोरेन यांना याच कायद्यानुसार तुरुंगात टाकलं आहे. केजरीवालांना याच कायद्याचा वापर करुन अटक करण्याचा घाट घातला जात आहे", असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. (Thackeray Group MP Sanjay Raut On CM Eknath Shinde and Kirit Somaiya)

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी हिललाईन पोलिस ठाण्यात केलेल्या गोळीबार प्रकरणावर देखील संजय राऊत यांनी भाष्य केलं. राऊत म्हणाले, गुन्हेगारी स्वरूपात कोणी पैसे घेतले तर त्यांना अटक झाली पाहिजे. त्या आमदाराच स्टेटमेंट आहे की माझे कोट्यवधी रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. मग याचा शोध ईडीने घेतला पाहिजे. तो पैसा त्यांनी स्वीकारला असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, यासाठी ईडीला पुरावा लागत नाही, स्टेटमेंट हाच पुरावा असतो. किरीट सोमय्यांची मिमिक्री करत एकनाथ शिंदे यांच्याकडे हिशोब मागा, असं थेट आव्हान राऊतांनी सोमय्या यांना केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संजय राऊतांची श्रीकांत शिंदेंवर टीका

श्रीकांत शिंदे हे बाळराजे आहेत, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र, गुंडगिरीला कोणाचं राजाश्रय आहे ? एक आमदार बाळराजे यांच्या माणसावर पोलिस स्टेशमध्ये गोळीबार करतात. एका उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव पुण्यात गुंडाच्या घरी गेले. आता कालच एकाचा फोटो आम्ही जाहीर केला, बाकी लवकरच करू, ते कोण आहेत ? याची माहिती पुणे पोलिसांनी द्यावी. मुख्यमंत्री कार्यालयातून या गुंडांवर मॉनिटर होतं, त्यासाठी पोलिस काम करत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली आहेत का ?, असा सावालही त्यांनी उपस्थित केला.

अजित पवारांवरही निशाणा

अजित पवारांनी बारामतीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना लोकसभा निवडणुकीसाठी आपण उमेदवार जाहीर करु, त्यावेळी काहीजण येतील, म्हणतील ही शेवटची निवडणूक आहे. तुम्हाला भावनिक करतील, पण तुम्ही भावनिक होऊ नका, अजित पवार उभा आहे, हेच समजून मतदान करा. कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत, असं विधान अजित पवारांनी केलं होतं. आता याच वक्तव्याचा समाचार संजय राऊतांनी घेतला आहे.

राऊत म्हणाले, अजित पवार एवढे निर्दयी होतील, असं वाटलं नव्हतं. ज्यांनी ताटात खाऊ घातलं, त्यांच्याबद्दल अशी वक्तव्य तुम्ही करत आहात, लांडग्यांच्या भूमिकेत तुम्ही गेले ही राज्याची संस्कृती कधीच नव्हती. तुम्ही राज्य करत आहात, ते या नेत्यांमुळेच. मोदींनी तुमच्यावर 70 हजार कोटींचा आरोप केला होता. हेच अमित शाह शिंदे यांना तुरुंगात टाकायला निघाले होते. शरद पवार नसते तर अजित पवार तुम्ही कोण असतात ?, असा खोचक टोला राऊतांनी लगावला.

(Edited By-Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT