Raigad : उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांपूर्वी माणगाव येथे झालेल्या सभेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी आमदार भरत गोगावले यांच्यावर कडाडून हल्ला केला होता. जाधव यांच्या या टीकेला आमदार भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर देत मोठा गौप्यस्फोट केला आहे. भास्कर जाधव हा आता कासावीस झालेला माणूस आहे. अशा शब्दात गोगावले यांनी भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला. (Bharat Gogawale News)
' आमचे महायुतीच्या आमदारांनी नेत्यांनी जो काही विकास कामांचा धूमधडाका लावला आहे. त्यामुळे भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. भास्कर जाधव आता कितीही आव आणून बोलत असले तरी त्यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ संधान साधलं होतं. त्यावेळेला काय करायचं काय नाही, याच्या चर्चा झाल्या. काय चर्चा घडल्या त्यावेळेला आम्ही तिथे सामोरे होतो, असाही गौप्यस्फोट आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale)यांनी केला आहे.
भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात महायुतीच्या आमदार, नेत्यांनी विकासाचा धुमधडाका लावला आहे. त्यामुळे भास्कर जाधव यांच्या मतदारसंघातील पकड सैल होत आहे. भास्कर जाधव यांनी वापरलेले शब्द आम्ही ऐकले आहेत. पण आव आणून बोलणाऱ्या या कासावीस झालेल्या भास्कर जाधव यांना आता जनताच उत्तर देईल. असे कितीही भास्कर जाधव आले आणि घसा नरड फोडून कितीही आव आणण्याचा प्रयत्न जरी केला तरी आमच्या महाड पोलादपूर माणगाव येथील जनतेवरती याचा काहीही परिणाम होणार नाही, असा दावा गोगावले यांनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जनता, माझे मतदार बांधव हे अत्यंत सूज्ञ आहेत. त्यामुळे असा आव आणून बोलणाऱ्यांना त्यांची जागा ते दाखवतील, असा विश्वास गोगावले यांनी व्यक्त केला. लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. रायगडचा लोकसभा मतदारसंघ हा गुहागरपर्यंत जातो. त्यामुळे या निवडणुकीत दुध का दूध पानी का पानी होऊन जाईल असेही थेट आव्हानच गोगावले यांनी भास्कर जाधव यांना दिले आहे.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.