Sanjay Raut News  Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : हा नियम फक्त विरोधकांसाठीच आहे का ? खेरांवरील कारवाईनंतर राऊतांचा भाजपला सवाल

Sanjay Raut : पंतप्रधान या पदाचा आम्ही नेहमीच आदर ठेवतो. पंतप्रधान पदाबाबत वक्तव्य करणे शक्यतो टाळली पाहिजेत.

सरकारमाना ब्युरो

Sanjay Raut : काँग्रेसचे नेते, माध्यमप्रमुख पवन खेरा (pawan khera) यांना आज (गुरुवारी) विमानातून पोलिसांनी उतरवले. दिल्ली विमानतळावर आसाम पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या घटनेमुळे काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी विमानतळावर भाजपच्या विरोधात घोषणा दिल्या आहे. यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी पवन खेरा यांच्याविरोधकांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायपूर येथे उद्यापासून (ता.२४) काँग्रेसचे अधियवेशन सुरु होत आहे, त्यासाठी पवन खेरा हे आज रायपूरला रवाना होत होते, यावेळी आसाम पोलिसांनी त्यांना विमानातून उतरवले.

संजय राऊत म्हणाले, “बोलण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. नेते मंडळीकडूनही कधी-कधी अशा चूका होतात. त्यामुळे मला वाटते की, पवन खेरा यांच्याकडून चुकून ते विधान आले असावे, पण आसाम पोलीस पवन खेरा यांना अटक करण्याची वाट बघत होते का ? कारण ते कधी विमानतळावर जाताहेत आणि आम्ही त्यांना अटक करतो. ज्यामुळे एक नवीन बातमी तयार होईल. पण या नव्या बातमीच्या नादात पवन खेरा यांना अटक करण्यात आली,”

या अटकेनंतर राऊतांनी भाजपावर टीका केली आहे. ‘पंतप्रधान या पदाचा आम्ही नेहमीच आदर ठेवतो. पंतप्रधान पदाबाबत वक्तव्य करणे शक्यतो टाळली पाहिजेत. पण हा नियम फक्त विरोधकांसाठीच आहे का ? कारण भाजपचे नेतेमंडळी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी याच्यासह अनेक नेत्यांवर अपशब्दांचा वापर करून टीका करतात," असे संजय राऊत यांनी म्हणाले.

पवन खेरा यांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. "पवन खेरा यांच्याबाबत केलेली कारवाई ही हुकूमशाही आहे," असे टि्वट काँग्रेसने केले आहे. लखनऊ महानगर भाजपचे अध्यक्ष मुकेश शर्मा यांनी 20 फेब्रुवारी रोजी पवन खेरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणावर काँग्रेस नेते पवन खेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. पवन खेरा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चुकीचे नाव घेताना दिसून आले. पवन खेरा म्हणाले की, आम्ही फक्त अदानी प्रकरणात जेपीसी स्थापन करण्याची मागणी करत आहोत. नरसिंह राव जेपीसी स्थापन करू शकले असते, अटलबिहारी वाजपेयी जेपीसी स्थापन करू शकले असते, मग नरेंद्र गौतम दास मोदींना काय हरकत आहे, असे ते म्हणाले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चुकीचे नाव घेतल्यानंतर त्यांनी माफी मागितली. यानंतर ते म्हणाले की, नाव दामोदर दास असेल, पण काम गौतम दासांचे आहे. या विधानानंतर पवन खेरा यांनी ट्विट केले. त्यात ते म्हणाले की, मी खरोखरच संभ्रमात पडलो आहे. हे दामोदरदास आहेत की गौतम दास.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT