CR Kesavan Resigns From Congress : देशाचे पहिले गव्हर्नर जनरल सी राजगोपालचारी यांचे (first indian governor general c rajagopalachari) पणतू, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सीआर केसवन (CR Kesavan) यांनी गुरुवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना त्यांनी सविस्तर पत्र लिहिले आहे. यात त्यांनी काँग्रेस सोडण्याची कारणे सांगितली आहेत. केसवन यांनी तामिळनाडू काँग्रेस कमिटी चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्तांकडेही राजीनामा पाठवला आहे.
काँग्रेस नेत्यांकडून सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणे या दोन प्रमुख कारणामुळे आपण राजीनामा दिला असल्याचे केसवन यांनी सांगितले. "मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे," असे केसवन यांनी स्पष्ट केले आहे.
"दोन दशकापेक्षा अधिक कार्यकाळापासून काँग्रेससाठी अथक परिश्रम केले. पण माझ्या हाती काहीही आले नाही, मी पक्षाच्या विचारधारेशी सहमत नाही. त्यामुळे काँग्रेसने माझ्यावर सोपवलेली मोठी जबाबदारी घेण्यास मी नकार दिला. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालो नाही," असे केसवन म्हणाले.
"सर्जिकल स्ट्राईकच्या पुराव्याची काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने मागणी केली, हे निराशाजनक आहे. माझी राजकारण करण्याची पद्धत पक्षाशी सुसंगत नाही हे माझ्या लक्षात आले आहे. मी गेल्या २२ वर्षांपासून काँग्रेसचा सदस्य होतो. पण दुदैवाने मला काँग्रेसची विचारधारा आणि भविष्याबाबतची वाटचाल ही रचनात्मकदृष्या नाही ज्या मूल्यांसाठी मी काम केले, ते आता राहिलेले नाही,"
कोण आहेत सीआर केसवन
सीआर केसवन यांनी 2001 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
त्यांनी राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्थेचं उपाध्यक्षपदही भूषवलं.
राजीनामा दिल्यानंतर त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश नाकारला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.