Shivsena (UBT) Sarkarnama
मुंबई

Thackeray Group March On BMC : भाजप-शिवसेनाविरोधात ठाकरे गटाच्या मोर्चाला सुरूवात

Shivsena UBT March In Mumbai : 'तोडून एफडी मुंबईची, चाकरी करतायत दिल्लीची'

सरकारनामा ब्यूरो

Shivsena (UBT) March On BMC : मुंबई महापालिकेत सुरू असलेल्या कथील भ्रष्टाचाराविरोधात शिवसेनेच्या (ठाकरे गट) मोर्चाला सुरूवात झाली आहे. भर पावसात हा मोर्चा निघाला आहे. हा मोर्चा महापालिकेच्या गेट क्रमांक दोनवर धडकणार आहे. या मोर्चाचे माजी मंत्री अदित्य ठाकरे यांनी नेतृत्व केले आहे. या मोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार असल्याची माहिती आहे. (Latest Political Marathi News)

या मोर्चात सहभाग ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या ८८ हजार कोटी रुपायांच्या एफडीवर भाजपचा डोळा असल्याचा आरोप यावेळी ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला. यावेळी 'तोडू एफडी मुंबईची चाकरी करतायत दिल्लीची' आदी घोषणाबाजी करीत राज्य सरकारवर निशाणा साधण्यात आले. महापालिकेतील भ्रष्टाचार आणि पालिकेच्या ठेवींबाबत हा मोर्चा असल्याचे ठाकरे गटाच्या नेत्यांनी सांगितले.

दरम्यान, ठाकरे गटाच्या मोर्चाला उत्तर म्हणून शिवसेना-भाजपच्या वतीनेही आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा मात्र त्यांनी रद्द केला. बुलढाण्यातील अपघाताच्या पार्श्वभूमीवर आम्ही मोर्चा रद्द केल्याची माहिती भाजप मुंबईचे अध्यक्ष अशिष शेलार यांनी दिली. दरम्यान, ठाकरे गटाकडून हा मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त केला. कितीही पाऊस असला तरी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. या मोर्चात ठाकरे गटाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहिले. दरम्यान, अदित्य ठाकरे लवकरच मोर्चात सहभागी होणार आहेत.

या मोर्चाचा मार्ग मेट्रो सिनेमा ते 'बीएमसी' असा असणार आहे. मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातात आहे. प्रशासकीय कारभारात हजारो कोटी रुपयांचे घोटाळे होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. रस्ते काँक्रिटीकरण घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा किंवा मग खडी घोटाळा याबाबतच्या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात आला आहे. यासह महापालिकेतील ८८ हजार कोटींच्या ठेवीवर राज्य सरकारचा डोळा आहे. मुंबईची वाट लावण्याचे काम केले जात असल्याचं ठाकरे गटाचे म्हणणे आहे.

ठाकरे गटाचे शक्ती प्रदर्शन ?

वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत बंडखोरी झाली होत. त्यानंतर शिवसेनेतील अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. दरम्यान, अनेक नगरसेवक शिंदे गटात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यानंतर मुंबई महापालिका निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही निवडणूक ठाकरे गटासाठी महत्वाची असणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणूक समोर ठेवून ठाकरे गटाकडून मोर्चाच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन केले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT