Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर अपघातात मृत्युमुखी पडला, तर लोक म्हणतात, 'देवेंद्रवासी झाला' ; पवारांचा निशाणा

Buldhana Bus Accident News : बुलडाणा येथे समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला.
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar on Buldhana Bus Accident : बुलडाणा येथे समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. यामध्ये २५ लोकांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण राज्यात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातानंतर घटनेच्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भेट दिली. मात्र, समृद्धी महामार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघातांवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) शिंदे फडणवीस सरकारचे कान टोचले आहेत.

या संदर्भात शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये पवार म्हणाले, "समृद्धीवर झालेला हा अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. अपघातात २५ लोकांचा बळी जाणे, ही बाब वेदना देणारी आहे. या महामार्गाचे कदाचित शास्त्रीयदृष्ट्या नियोजन केलेले नसावे. त्याचा दुष्परिणाम असा आहे. अपघातात लोकांचे मृत्यू होत आहेत.

Sharad Pawar News
Sharad Pawar on Buldhana Bus Accident: पाच लाख रुपये देऊन प्रश्न मिटणार नाही..; शरद पवारांनी राज्य सरकारला फटकारले

मी मध्यंतरी या महामार्गाने गेलो होतो. त्यावेळी काही लोक दिसले. त्यांना या महामार्गाबद्दल विचारले. तर ते लोक म्हणाले, या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. ते लोक असे म्हणत होते की, आमच्या गावात आता चर्चा अशी आहे की, एखाद दुसरा अपघात झाला आणि व्यक्ती गेली की लोक म्हणतात, अपघातात एक 'देवेंद्रवासी' झाला. महामार्ग तयार करण्याच्या काळात, नियोजन आखण्यात ज्यांच्यावर जबाबदारी होती, त्यांना लोक दोषी ठरवतात, असा हल्लाबोल पवार यांनी केला.

"ही घटना अत्यंत दुःखद घटना आहे. २५ माणसे गेली ही बाब वेदनादायी आहे. आम्ही एकच गोष्ट ऐकत आहोत. अपघात झाला राज्य सरकारने पाच लाख रुपये दिले आहेत. पाच लाख रुपये देऊन प्रश्न सुटणार नाही. या देशात रस्त्यांचे नियोजन याचे ज्ञान असणारे कर्तबगार लोक आहेत. त्यांची एक टीम तयार करावी."

Sharad Pawar News
Samruddhi Mahamarg Accident : ...म्हणून अपघातातील मृतांची ओळख पटवण्यात अडचण; 'ट्रॅव्हल एजंट'ही फरार

"त्यामध्ये कुठे चूक झाली आहे, कशामुळे चूक झाली. हे तपासले गेले पाहिजे. अपघातांची स्थिती, वाढते अपघात हे कसे थांबतील, हे बघितले पाहिजे. फक्त पाच लाख रुपये जाहीर करुन प्रश्न सुटणार नाही. जी काही कमतरता आहे, ती शोधून काढली पाहिजे," असे पवार म्हणाले.

"मी काही किलोमीटर या रस्त्यावर प्रवास केला. रस्ता म्हंटलं की काही खुणा असतात. मात्र हा रस्ता सलग सरळ आहे. वाहन चालवणाऱ्यावर याचा काही परिणाम होतो का? अशी काही शंका लोकांनी बोलून दाखवली. मात्र, मी काही त्यातला तज्ज्ञ नाही. मात्र, कुठे त्रुटी राहिल्या आहेत ते पाहिले गेले पाहिजे," असेही पवार यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com