Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Shivsena (UBT) News : ठाकरे गटाची अडचण वाढणार; चव्हाणनंतर आता 'यांची' चौकशी होणार

Covid Center Scam : कोविड काळात महापालिकेशी झालेल्या व्यवहारांची होणार चौकशी

सरकारनामा ब्यूरो

ED Enquiry Increase Tension Shivsena (UBT) : मुंबई महापालिकेतील कथित कोविड सेंटर गैरव्यवहारप्रकरणी शिवसेनेच्या (उबाठा) अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले सूरज चव्हाण यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. सूरज चव्हाण यांची सोमवारी (दि.26) साडेआठ तास चौकशी झाली. तत्पुर्वी, ईडीने जवळपास 17 तास सूरज चव्हाण यांच्या घरी चौकशी केली होती. दरम्यान, ही चौकशी कायम राहणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. (Latest Political News)

सूरज चव्हाण यांच्यानंतर त्यांच्या भावाचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे ईडीकडून स्पष्ट करण्यात येत आहे. त्यामुळे चव्हणा कुटुंबीयांसह ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोविड घोटाळ्याची व्याप्ती तपासण्यासाठी ईडीकडून सूरज यांच्या भावाची चौकशी करण्यात येणार असल्याचे समजत आहे. मुंबई महापालिकेतील कथित कोविड काळातील घोटाळ्यात विविध कंपन्यांना टेंडर देण्यात आले होते. यात सूरज चव्हाण यांच्या भावांच्या कंपन्यांचा समावेश तर नाही ना, याबाबत ईडी तपास करणार आहे.

चौकशीदरम्यान सूरज चव्हणा यांच्या भावाच्या नावावर तीन खासगी कंपन्या असल्याचे आढळले आहे. या कंपन्यांना कोविड काळात महापालिकेकडून काही टेंडर दिले आहेत का नाही, या कंपनीशी पालिकेचा व्यवहार झाला की नाही, या दृष्टीने तपास करण्यात येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, चव्हाण यांच्या भावाच्या कंपनी आणि पालिका यांच्यात काही व्यवहार आढळले तर सूरज चव्हाण यांच्यासह कुटुंबीयांच्या अडचणी वाढणार आहेत. सूरज यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबीयाची होणारी चौकशी ठाकरे गटाची चिंता वाढवणारी ठरू शकते, असे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

दरम्यान, सोमवारी (ता. २६) सूरज चव्हाण यांची साडेआठतास चौकशी करण्यात आली. यावेळी कोविड घोटाळ्यानंतर चव्हाण यांनी काही मालमत्ता घेतली का याबाबत तपासणी केली. कोविड काळातील झालेल्या घोटाळ्यातून मिळालेल्या पैशांतून त्यांनी मालमत्ता खरेदी केली का याची चौकशी केली. यानंतर आता कोविड घोटाळ्यात काही टेंडर भावाच्या कंपन्याना देण्यात आले होते का, याची चौकशी करण्यात आहे.

या घोटाळ्याप्रकरणी काही अधिकारीही रडारवर आहेत. त्यांचीही चौकशी होणार आहे. काही दिवसांपूर्वी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. यामुळे अधिकारी वर्गात अस्वस्थता पसरली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT