Eknath Shinde on Ashadhi Wari : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; आषाढी वारीत सहभागी वाहनांना टोलमाफी, सुसज्ज यंत्रणा आणि बरचं काही..

Pandharpur Ashadhi Wari: गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावेळी वारीला जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे.
Eknath Shinde
Eknath Shindesarkarnama

Ashadhi Wari Toll Free : यंदाच्या पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना टोल माफ करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे. गुरुवारी (१ जून) पंढरपूरच्या आषाढी वारीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री शासकीय अतिथीगृहावर बैठक पार पडली या वेळी त्यांनी संबंधितांना महत्त्वाच्या सूचना केल्या.

वारीसाठी आलेल्या आणि सहभागी झालेल्या वाहनांना टोलमाफी

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावेळी वारीला जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने वारीचं चोख नियोजन करावं, विशेष म्हणजे पालखी मार्गासह वारीत सहभागी झालेल्या वाहनांनाही टोल माफ करण्याबाबत विशेष व्यवस्था करावी, वाहनांना टोल द्यावा लागू नये, यासाठी पोलीस विभागाकडून या वाहनांना स्टिकर्स किंवा पासेस दिले जावेत. वारकऱ्यांना टोल द्यावा लागू नये, यासाठी टोल नाक्यांवर विशेष नियोजन करावं, अशाही सुचना त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत. यासोबतच पालखी मार्गावर टोल नाके सुरू करु नयेत.यासाठीही मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना याबाबत कल्पना दिल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं.

Eknath Shinde
Ashok Gehlot Announce Free Electricity : 'मोफत वीज' ठरली सत्तेच्या सोपानाचं ‘जुगाड’ ; दिल्ली, पंजाबनंतर आता 'या' राज्यातही..

निधी

आषाढी वारीसाठी निधी कमी पडू देणार नाही. अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे नगरपालिकेच्या निधीत १० कोटी आणि ग्रामपंचायतींसाठी ५० लाख रुपयांची अशी दुप्पट तरतूद करण्यात आहे. याशिवाय रस्त्यांसाठीही वेगळा निधी दिला आहे. त्यामुळं रस्त्यांची परिस्थिती सुधारण्याबाबत काळजी घ्या. वारकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. (Pandharpur Ashadhi Wari News)

वारी मार्गावर चोख व्यवस्था

तसेच, पालख्यांचे प्रस्थान होण्याआधीच वारीसाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवा. वारी मार्गावर पिण्याच्या पाण्याचे विशेष नियोजन करा. कोणत्याही परिस्थितीत मनुष्यबळ, यंत्रणा, साहित्य कमी पडणार नाही, याचं चोख नियोजन करा. वारी मार्गात येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषदांच्या यंत्रणाचीही मदत घ्या. वारी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीचे तंबू-निवारे, पंखे, निवारे, स्वच्छतागृहे उभारा. (Ashadhi Wari)

Eknath Shinde
DRDO News : 'हनीट्रॅप'मध्ये अडकलेल्या डॉ.कुरुलकरांच्या जागी 'डीआरडीओ'च्या संचालकपदी मकरंद जोशी

वारी मार्गांवरील रस्त्यांचे डांबरीकरण

वारी मार्गांवर वैद्यकीय पथके, तज्ज्ञ डॉक्टर्स आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवा. वारकऱ्यांसाठी औषधे, पिण्याचे पाणी आणि इतर आरोग्य सुविधांचे योग्य नियोजन करा. पंढरपूरमधील रस्त्यांसाठी दिलेल्या निधीतून पंढरपूर नगरपालिका आणि आजूबाजूच्या रस्त्यांचे डांबरीकरण करा, अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com