Shiv Sena vs BJP Maharashtra : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आणि राणे यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे. शिवसेना सोडल्यानंतर राणेंचा राजकीय प्रवास काँग्रेसकडून भाजपमध्ये झाला. भाजप महायुती सरकारमध्ये केंद्रात नारायण राणेंना मंत्रिपदावर संधी मिळाली. महायुती सरकारमध्ये राणे परिवारातील नारायण राणे खासदार आहेत. त्यांचे दोन्ही मुलं नीलेश आणि नीतेश आमदार आहेत. नीतेश राणे भाजप मंत्री आहेत.
भाजपमध्ये असलेले राणे कुटुंब महाराष्ट्रात सर्वाधिक कोणाला टार्गेट करत असेल, तर ठाकरे परिवाराला आणि ठाकरे सेनाला. भाजपमध्ये गेल्यापासून, वेगवेगळ्या कारणानं राणेंकडून ठाकरे परिवाराला टार्गेट केलं जात आहे. आता मात्र ठाकरे सेनेचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी मंत्री राणेंना घेरण्याची कायदेशीर रणनीती आखली आहे. त्यामुळे हा राजकीय संघर्ष पुन्हा कायद्यात सापडून अधिक पेटणार असेच चित्र निर्माण झालं आहे.
भाजप (BJP) मंत्री नीतेश राणे यांनी वडील खासदार नारायण राणे यांच्या 10 एप्रिल वाढदिवशी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या महाविकास आघाडी सरकार असताना, राणे साहेबांबरोबर झालेला अटकेचा प्रसंग सांगितला. या क्षणाचा परतफेड केल्याशिवाय शांत बसणार नाही. अटक केलेला क्षण आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला आहे. ज्या दिवशी परत फेड करेन, त्याच दिवशी डिलीट करेल, असे म्हणत, ठाकरे सेनेला इशारा दिला होता.
राणे कुटुंबियांकडून ठाकरे (Uddhav Thackeray) आणि ठाकरेसेनेला वारंवार टार्गेट केलं जात आहे. दिशा सालियान मृत्यूप्रकरणावर वारंवार भाष्य केले जात आहे. भाजप मंत्री नीतेश राणे हिंदुत्वाच्या मुद्यावर जहालपणे आक्रमक आहेत. यातून त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधानं केले आहेत. इतिहासावर बोलताना देखील त्यातून वाद झाले आहेत. भाजप मंत्री राणेंना घेरण्याची रणनीती ठाकरे शिवसेनेचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी आखली आहे.
विनायक राऊत यांनी आज रत्नागिरी इथं पत्रकार परिषद घेत, भाजप मंत्री नीतेश राणे यांच्यावर निशाणा साधला. नीतेश राणे यांनी व्हिडिओ डिलीट करण्याच्या विधानावर नीतेश राणे यांनी फक्त स्वप्न बघावीत. त्यांना डराव डराव करून बेडूक उड्या मारण्याची फक्त सवय आहे. ते उंचीप्रमाणेच बोलताहेत, त्यामुळे आम्ही त्यांना फार किंमत देत नाही, असा टोला लगावला.
भाजप मंत्री नीतेश राणे यांचा मुजोर आणि गर्विष्ठ मंत्री, असा उल्लेख करत धडा शिकविण्याचं काम सुरू केल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले. नीतेश राणे यांना अपात्र करा म्हणून गव्हर्नरकडे अपील केलं आहे, ते जर झालं नाही, तर पुढच्या 15 दिवसांत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगून विनायक राऊत यांनी राणेंविरुद्ध शड्डू ठोकल्याचं सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.