Congress vs BJP Maharashtra : दोन उपमुख्यमंत्र्यांना 'मॅनेज' करतानाच फडणवीसांची दमछाक; हर्षवर्धन सपकाळांच्या टोल्यानं महायुती 'घायाळ'

Congress state president Harshwardhan Sapkal BJP leader Devendra Fadnavis deputy CMs Mahayuti alliance interview Pune Sakal Maharashtra : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुतीच्या कामकाजावर टीका करताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर टोलेबाजी केली.
Harshawardhan Sapkal Devendra Fadnavis
Harshawardhan Sapkal Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics 2025 : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारच्या कामकाजाला जोरदार लक्ष्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन महत्त्वाची खाती आहेत.

परंतु त्यांची सर्वाधिक दमछाक होते, ती दोन उपमुख्यमंत्री यांना मॅनेज करताना, असा टोला हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला. याचाच अर्थ, कामकाजापेक्षा महायुती सरकारमधील धुसफूस मोठी आहे, ती कधीही उफाळून येईल, असा दावा सपकाळ यांनी केला.

हर्षवर्धन सपकाळ पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी दैनिक 'सकाळ' पुणे (PUNE) कार्यालयाला भेट देत मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी काँग्रेसची राज्यातील वाटचाल, संघटन, मित्रपक्ष यावर भाष्य करताना, महायुती सरकारच्या धार्मिक आणि जातीय द्वेष राजकारणावर टीका केली.

Harshawardhan Sapkal Devendra Fadnavis
EVM Hacking Global Reaction : 'EVM' हॅक करून निवडणुकीचा निकाल फिरवणे शक्य; अमेरिका इंटेलिजन्सच्या दाव्यानं जगभरात खळबळ

काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे दोन महत्त्वाची खाती आहे. गृह आणि ऊर्जा, अशा महत्त्वाच्या खात्यांवर त्यांचे नियंत्रण नाही. त्यांचा सर्वाधिक दमछाक राज्यातील दोन उपमुख्यमंत्री मॅनेज करताना होते. परिणामी दोन्ही खात्यांवर दुर्लक्ष झालेले दिसते. वीज बिलात वाढ होणार नाही, अशी घोषणा केली जाते आणि अचानक वाढीव बिल येते. स्मार्ट मीटरमुळे 30 ते 40 टक्के वाढीव वीज बिल येऊ लागल्याने त्यात मोठा गैरव्यवहार दिसतो. मुख्यमंत्र्यांकडे ही खाती असून देखील गडबड आहे, असा गंभीर आरोप केला.

Harshawardhan Sapkal Devendra Fadnavis
Rutuja Patil: जय पवार यांच्याशी साखरपुडा झालेल्या ऋतुजा पाटील स्वत: आहे 'या' मॉलच्या संचालिका...

राज्यातील कायदा-सु्व्यवस्थेवर बोलताना, गृह खात्याला स्वतंत्र मंत्री असावा, अशी आमची मागणी आहे. राज्यात कोयता गँग, आका, खोक्या असले प्रकार वाढत चालले आहेत, असा गंभीर आरोप देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चाॅकलेट बाॅय असल्याचे सांगितले जाते. त्यांच लक्ष धारावी पुनर्विकास, नवी मुंबई विमानतळाचे काम आदानीला देणे, शक्तिपीठ महामार्ग करणे याकडे आहे, असा टोला देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com