entery shivsena 
मुंबई

Thackeray Shivsena: एकीकडं खिंडार! तरीही 400 हून अधिक राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

Thackeray Shivsena नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.

Amit Ujagare

Thackeray Shivsena : नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. त्याचबरोबर आगामी महापालिका निवडणुका तसंच मुंबईची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची साथ अनेक नगरसेवक, कार्यकर्ते आणि संघटनेत महत्वाच्या पदांवर असलेल्या नेत्यांनीही सोडली. पण मुंबईत आजचा दिवस ठाकरेंसाठी महत्वाचा ठरला. कारण तब्बल ४०० राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

भांडुपमध्ये ४०० हून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. आमदार सुनील राऊत आणि माजी आमदार रमेश कोरगावकर यांच्या उपस्थितीत हे पक्ष प्रवेश पार पडले. वॉर्ड क्रमांक ११५ मधील शिंदे गटातल्या माजी नगरसेवकांना टक्कर देण्यासाठी हे मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश झाले असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, सुनील राऊत, रमेश कोरगावर आणि इतर महिला नेत्यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हातावर शिवबंधन बांधत त्यांचं पक्षात स्वागत केलं. यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यावेळी या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या नावाचा जयघोष केला. तसंच दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या घोषणाही दिल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT