Nashik Shivsena: "भाजपने आकड्यांनुसार मोठा भाऊ होऊ नये, मनाने पण तसं वागावं अन्यथा..."; शिंदेंच्या नेत्याचा भाजपला इशारा

Nashik Shivsena: नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या यशानंतर शिंदेंच्या शिवसेनेची बार्गेनिंग पावर वाढली आहे.
Nashik Corporation, Shivsena, BJP
Nashik Corporation, Shivsena, BJPSarkarnama
Published on
Updated on

Nashik Shivsena: नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या यशानंतर शिंदेंच्या शिवसेनेची बार्गेनिंग पावर वाढली आहे. त्यामुळं भाजपनं फक्त आकड्यांनुसार मोठा भाऊ होऊ नये, मनाने देखील मोठ्या भावासारखं वागावं अशा शब्दांत, शिवसेनेच्या एका नेत्यानं भाजपला सुनावलं आहे. तसंच सन्मानपूर्वक युती होत असेल तर मान्य अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी करु, असा इशाराही या नेत्यानं दिला.

Nashik Corporation, Shivsena, BJP
Mundhwa Land Scam: पार्थ पवारांना अजितदादांचे 3 OSD, आयुक्त अन् गुन्हे शाखेंच्या अधिकाऱ्यांची मदत? दमानियांनी धक्कादायक कागदपत्रं आणली समोर

शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांनी म्हटलं की, "मोठ्या भावाने लहान भावाला सांभाळलं पाहिजे, सन्मान दिला पाहिजे. भाजपने फक्त आकड्यांनुसार मोठा भाऊ होऊ नये, मनाने देखील मोठ्या भावासारखं वागलं पाहिजे. मेरिटनुसार आमची जागांची मागणी असून सन्मानपूर्वक युती होत असेल तर ती युती मान्य असेल अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी करु" असा इशाराही त्यांनी भाजपला दिला आहे.

Nashik Corporation, Shivsena, BJP
Shivsena Politics : गळती थांबेनाच! ठाकरेंचे पहिल्या फळीतले सर्वच नेते गेले शिंदे सेनेत; आता 'हा' नेता करणार भाजपत प्रवेश

नाशिक महापालिकेसाठी शिवसेनेकडून भाजपला ४५ जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र, अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही, तिढा कायम आहे. भाजप आमच्यासोबत फक्त चर्चाच करतंय, मात्र रिझल्ट निघत नाही. भाजपने सन्मानपूर्वक जागा न दिल्यास १२२ जागांवर लढण्यासाठी शिवसेना सज्ज आहे, असा इशाराही अजय बोरस्ते यांनी दिला आहे. नगरपरिषद निवडणुकीतील यशानंतर शिंदेंच्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर चांगलीच वाढली आहे.

दरम्यान, बोरस्ते यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वाच्या भूमिकेवरही टीका केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com