Eknath Shinde, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Thackeray Vs Shinde : विधानसभेच्या तोंडावर शिंदेंनी ठाकरेंचं टेन्शन वाढवलं, उच्च न्यायालयात धाव, 'हे' आहे कारण

Shivsena MLA Disqualification Case : 'शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह आमच्याकडे असून त्यामुळे खरी शिवसेना आमचीच आहोत.ते शिवसेना नाही. मात्र,तरीही...'

Deepak Kulkarni

Mumbai News : शिवसेनेतील फुटीला दोन वर्ष उलटले तरीही ही बंडाची धग अद्यापही कायम आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह बहाल करण्यात आलं. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नव्या नावासह आणि मशाल चिन्हासह लोकसभेला उतरावं लागलं.

ठाकरेंनी आपल्या जीवावर तब्बल 9 तर शिंदेंनीही पूर्ण ताकद पणाला लावत 7 खासदार निवडून आणले. पण दोन्ही गटातला वाद दिवसेंदिवस टोक गाठत चालला आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमधून विस्तवही जात नाही. अशातच आता शिंदे गटाने ठाकरे गटाचं टेन्शन वाढवलं आहे.

विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. तसेच महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटानेही कंबर कसली आहे.

पण याचदरम्यान,ठाकरे गटाचे आमदार लवकरात लवकर अपात्र करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यामुळे विधानसभा निवडणुका तोंडावर असताना शिंदे गटानं ठाकरेंसह त्यांच्या आमदारांना कायदेशीर लढाईसाठी पुन्हा एकदा कोर्टात खेचलं आहे.

शिवसेना प्रवक्ते आणि आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी ठाकरे गटाच्या आमदारांविरोधात याचिका दाखल केली असल्याचं म्हटलं आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह आमच्याकडे असून त्यामुळे खरी शिवसेना आमचीच आहोत.ते शिवसेना नाही. मात्र,तरीही ठाकरे गटाच्या आमदारांनी आमच्या व्हिपचे पालन केलेले नाही. त्यामुळे आम्ही मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे गोगावले यांनी सांगितले.

उच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. आमच्या विरोधात त्यांनाही सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे.ते काही करू शकतात.त्यांना जाऊ द्या,पण विजय हा आमचाच होईल असा दावाही आमदार भरत गोगावले यांनी यावेळी केला.

अजितदादा कुठे गायब...

मंत्रिमंडळ बैठकीत निधीवाटपावरुन खडाजंगी, मध्यरात्री दिल्लीवारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत बंद दरवाजाआड जवळपास 40 ते 45 मिनिटं चर्चा, या सगळ्या घडामोडींनंतर महायुतीत उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे.मात्र, शिंदे गटाच्या भरत गोगावले यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे.

ते म्हणाले, अजितदादा कुठे गायब नाही.ते पुण्यामध्ये आहे.पुण्यात अतिवृष्टी झाली आहे.त्यामुळे त्या ठिकाणी थांबून ते पूरस्थितीचा आढावा घेत आहेत.तसेच लाडकी बहीण योजनेचा पैसा हा प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघातही जाणार आहे. लाडकी बहीण योजना ही जर इतर राज्यांमध्ये हिट झाली. तर ती महाराष्ट्रातही सुपर हिट होईल त्यामुळे कुठल्याही आमदारांनी त्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कारण नाही अशा शब्दांत त्यांनी विरोधकांनाही फटकारले आहे.

तसेच या योजनेवर अजितदादांचीही अजिबात नाराजी नाही. अधिकाऱ्यांमध्ये जर नाराजी असेल तर त्यांनी ही योजना राबवायला पाहिजे. कारण, लाडकी बहीण ही योजना सगळ्यांच्या हिताची आहे.या योजनेबाबत सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे बसून निर्णय घेतला असल्याचेही गोगावले यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT