Mumbai News : मुंबई शिवसेना फुटीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमधून विस्तवही जाताना दिसून येत आहे.दिवसेंदिवस दोन्ही नेत्यांमधला संघर्ष आणखी तीव्र होताना पाहायला मिळत आहे.लोकसभेनंतर विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीतही उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दमदार कामगिरी करत या दोन्हीही जागा जिंकल्या आहेत.अशातच मुंबईतून एक मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज बांधणे खूपच कठीण होत चालले आहे. एकीकडे सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्यातला सामना अधिकाधिक टोकदार होत असतानाच पावसाळी अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची अगोदर उद्धव आणि नंतर आदित्य ठाकरेंसोबत भेट झाली होती.आता ठाकरेंच्या आमदाराने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच पत्र लिहिलं आहे.
ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी आमदारांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे मोठी मागणी केली आहे.वरळी येथील बीडीडी चाळ परिसरात झाड कोसळून मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबियांना तातडीने भरीव आर्थिक मदत करण्यात यावी,अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
दुर्घटनाग्रस्त तरुणाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे सुनील शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना हे पत्र लिहले आहे. या पत्रात वरळीतील गांधी मैदान रोड लगतच्या बीडीडी चाळ क्र. ८९ जवळील गूळभेंडीचे झाड अंगावर पडल्याने 1 जुलैला अमित जगताप या 45 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला झाला होता.त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी ठाकरेंच्या आमदाराने मोठं पाऊल उचललं आहे.
शिंदे पत्रात म्हणतात, अमित जगताप यांच्या मृत्यूमुळे पावसाळयापूर्वी धोकादायक झाडे तोडल्याचा आणि झाडांच्या फांद्यांची छाटणी केली असल्याचा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा दावा फोल ठरला आहे. या दुर्घटनेत कुटुंबातील कमावत्या पुरुषाचा मृत्यू झाला असल्याने कुटुंबियांवर आभाळ कोसळले आहे. त्यांच्यासमक्ष उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यास्तव सदरहू दुर्घटनेत नाहक जीव गमवावा लागलेल्या मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी आमदार सुनील शिंदे यांनी केली आहे.
शिवसेना शिंदे गट आणि मनसेकडून वरळी विधानसभा मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात महायुती तगडं आव्हान उभं करण्याची शक्यता आहे. याच धर्तीवर ठाकरेंविरोधात एखादा बडा नेता मैदानात उतरवला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.