MP Sandipan Bhumre : खासदार संदिपान भुमरे यांच्या मुलाला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

MP Sandipan Bhumre gives birthday wishes' to vilas Bhumre : संपूर्ण जिल्हाभरात विलास भुमरे यांचा पैठण विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार असा उल्लेख करणारे बॅनर झळकतांना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर भुमरे यांनी त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी दिलेल्या शुभेच्छा लक्ष वेधणाऱ्या ठरत आहेत.
MP Sandipan Bhumre gives birthday wishes' to vilas Bhumre
MP Sandipan Bhumre gives birthday wishes' to vilas BhumreSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती विलास उर्फ बापू भुमरे यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने वडील संदिपान भुमरे यांनी त्यांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

संपूर्ण जिल्हाभरात विलास भुमरे यांचा पैठण विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार असा उल्लेख करणारे बॅनर झळकतांना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर भुमरे यांनी त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी दिलेल्या शुभेच्छा लक्ष वेधणाऱ्या ठरत आहेत.

विलास बाप्पू, आज तुझा वाढदिवस!

लहानपणापासूनच तू जनतेत रमला, त्यांचे प्रश्न सोडविणे, संवाद साधणे हे तुला आवडत होते. याच बळावर तुला जनतेने देखील प्रेम दिले. कुटुंबाचा वारसा जपण्यासाठी तू तुझे संपूर्ण प्रयत्न केले आणि म्हणूनच तुझे स्वतंत्र अस्तित्व देखील तयार झाले.

तुझा हाच निर्मळ स्वभाव, शिकून घेण्याची हातोटी भविष्यात तुला यशस्वी करणार आहे. आज वाढदिवशी जनसेवेचा हाच वसा वृध्दींगत करावास याच सदिच्छा!, अशा शब्दात भुमरे यांनी मुलाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

MP Sandipan Bhumre gives birthday wishes' to vilas Bhumre
Parali Firing Case Update : परळी गोळीबार प्रकरणात ट्विस्ट, खून झालेल्या बापू आंधळेंवर गुन्हा दाखल

पाचोड ग्रामपंचायती (Gram panchyat) पासून आपल्या राजकारणाला सुरुवात करणारे खासदार संदिपान भुमरे हे पैठणच्या संत एकनाथ साखर कारखान्यात स्लीप बॉय म्हणून काम करत होते. राजकारणात आल्यानंतर त्यांचे नशीब फळफळले आणि ज्या कारखान्यात स्लीप बॉय म्हणून काम केले तिथेच चेअरमन म्हणून खुर्चीवर बसण्याचा मान भुमरे यांना मिळाला होता.

त्यानंतर शिवसेनेच्या (Shivsena) माध्यमातून पैठण विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा उमेदवारी आणि पाच वेळा विजय मिळवत भुमरे यांनी तालुक्यावर आपली मजबूत पकड बसवली. दरम्यान मुलगा विलास भुमरे हा राजकारणात वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सक्रिय होत होता. विहामांडवा येथील रेणुका सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात वाटचाल करत असतानाच विलास भुमरे यांना आता विधानसभेचे वेध लागले आहे.

MP Sandipan Bhumre gives birthday wishes' to vilas Bhumre
Abdul Sattar News : आधी बांगर, आष्टीकरांसोबतच्या बैठकीने खळबळ उडवली, नंतर राज्याचा पुढचा 'CM' ही सांगून टाकला

संदिपान भुमरे लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून निवडून गेले असल्यामुळे पैठण विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढवण्याचा मोकळा झाल्याचे बोलले जाते. पैठण मतदारसंघात आपला राजकीय वारसा पुढे विलास भुमरे हे चालवतील असेच संदिपान भुमरे यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल अधोरेखित केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com