Raj Thackeray on vote theft Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray on vote theft : राहुल गांधींचा 'वोट चोरी'चा मुद्दा राज ठाकरेंना पटला? कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला, 'मविआ'कडे झुकल्याची चर्चा!

Thane Ambernath Raj Thackeray Cautions Workers on Rahul Gandhi Vote Theft Issue : ठाणे अंबरनाथ इथं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत, 'वोट चोरी'च्या मुद्यावरून सावध केलं आहे.

Pradeep Pendhare

MNS rally Thane Ambernath : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मुद्दा देशभर विरोधकांनी उचलून धरला आहे. भाजप सत्ताधाऱ्यांना हा मुद्दा जड जाताना दिसतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा विरोधकांनी उचलून धरल्याचे महाराष्ट्रात चित्र आहे. महाराष्ट्रात हा मु्द्दा महाविकास आघाडी तापवत असताना, ठाकरे बंधूंमधील राज ठाकरेंना देखील हा मुद्दा भावल्याचे दिसते.

ठाणे अंबरनाथ इथंल्या आजच्या मेळाव्यात 'वोट चोरी'च्या मुद्यावरून राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांच्या यावरून साधव राहण्याच्या सूचना दिल्यात. राज ठाकरेंनी हा मुद्दा उचलून धरल्याने उद्धव ठाकरेंबरोबर ते देखील महाविकास आघाडीकडे झुकल्याची चर्चेने जोर धरला आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाणेमधील अंबरनाथ दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी पक्षासाठी शहर कार्यकारिणी जाहीर केली. परंतु या मेळाव्यात मार्गदर्शन करताना, माध्यमांना दूर ठेवले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांना राज ठाकरेंनी नेमका कोणता कानमंत्र दिला, याची उत्सुकता होती. यातून राहुल गांधी यांच्या 'वोट चोरी'च्या मुद्यावरून राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना अतिशय सावध राहण्याच्या सूचना केल्याचे समोर आलं आहे.

राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, "निवडणुकीत गाफिल राहू नका, मतदार (Voter) आपल्याला मतदान करतात. मात्र ही मतं चोरीला जातात. त्यामुळे मतदार याद्यांचा अभ्यास करा, प्रत्येक यादीवर दोन बीएलओ नेमा आणि गट अध्यक्षांना याद्यांची जबाबदारी वाटून द्या."

मत चोरीच्या मुद्यावरून, राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सावध केले असताना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाशी सुरू असलेल्या युतीच्या चर्चेवर भाष्य करण्याचे टाळले. तसंच मनसेतून शिवसेनेमध्ये गेलेल्या नगरसेवकांबाबतही राज ठाकरे यांनी कोणतंही वक्तव्य केलं नाही. मात्र अंबरनाथ शहराची नवी कार्यकारिणी जाहीर करून, तयारीच्या सूचक सूचना राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या.

या कार्यकारिणीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, शहर संघटक, उपशहर अध्यक्ष, विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, अशा अनेक नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. वादात सापडलेल्या काही जुन्या चेहऱ्यांना, मात्र नव्या कार्यकारिणीतून हटवण्यात आलं आहे. राज ठाकरे यांच्या या अंबरनाथ दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून निवडणुकीसाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील, असे दिसते आहे.

महाराष्ट्रात फक्त ठाकरेच...

राज ठाकरे यांच्या अंबरनाथ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जोरदार बॅनरबाजी केली. महाराष्ट्रात एकच ब्रँड ठाकरे ब्रँड.., महाराष्ट्रात फक्त मराठीच.., मराठीसाठी फक्त ठाकरे.., अशा टॅगलाईन वापरण्यात आल्या होत्या. या बॅनरबाजीवरून ठाण्यात राजकीय चर्चा रंगली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT