BJP MLA Gopichand Padalkar : यशोमती ठाकुर कडाडल्या; फडणवीसांना 'गिरेबान में झांक के देखो'चा टोला

BJP MLA Gopichand Padalkar Remark on Jayant Patil Criticized by Amravati Congress Yashomati Thakur Targeting CM Devendra Fadnavis : नेते जयंत पाटील यांच्याविषयी भाजपचे गोपीचंद पडळकर केलेल्या विधानावरून काँग्रेसच्या यशोमती ठाकुर यांनी भाजप नेते सीएम देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
Yashomati Thakur
Yashomati ThakurSarkarnama
Published on
Updated on

Jayant Patil controversy : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर टिका करताना, त्यांच्या परिवाराविषयी केलेल्या विधानावर संतापाची लाट उसळली आहे.

अमरावतीमधील काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकुर यांनी यावरून पडखळकरांसह भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'गिरेबान में झांक के देखो, यह क्या हो राहा है', असा टोला लगावला आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर टिका करताना त्यांच्या परिवारावर केलेल्या विधान केले. यावरून संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून, जतमध्ये मोर्चा काढण्यात आला आहे.

नेते शरद पवार यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत थेट भाजप (BJP) नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील या प्रकाराची गंभीर दखल घेत, गोपीचंद पडळकर यांचे कान टोचले आहे. परंतु गोपीचंद पडळकर यांनी मी विधानावर ठाम असून, माफी मागण्याचा विषयच येत नाही, अशी भूमिका घेतली आहे.

Yashomati Thakur
BJP Ganesh Naik warning : शिंदेंच्या शिवसेनेची भाजप मंत्र्यांविरोधात न्यायालयात धाव; गणेश नाईकांचा, 'दम है तो रोक के बताओ'चा इशारा

गोपीचंद पडळकर यांच्या या विधानावरून काँग्रेसच्या यशोमती ठाकुर चांगल्याच कडाडल्या आहेत. "महाराष्ट्राची संस्कृती ही महाराष्ट्राची ओळख आहे. परंतु राज्यात 2014 पासून भाजपचे वर्चस्व आले, तेव्हापासून महाराष्ट्रात वाचाळीवरांची संख्या वाढली आहे. त्यांचे प्रभुत्व वाढले आहे. भाजपमधील काही नेते स्वतःला भाऊ म्हणून घेत आहेत परंतु ते जेव्हा आई-वडिलांवर बोलतात तेव्हा, त्यांच्या तोंडातून अक्षरश: गटारी वाहतात," असा घणाघात यशोमती ठाकुर यांनी केला.

Yashomati Thakur
BJP ShivsenaUBT alliance claim : उद्धवसेनेची भाजपला मदत? एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता, महायुतीमधील समन्वय कोलमडलं!

'या सर्वांना भाजपचे वरिष्ठ नेत्यांचे खतपाणी आहे, हे आणखी दुर्दैव्याची बाब आहे. दुसरीकडे आम्ही संस्कृती सांभाळतो, आम्ही धर्म सांभाळतो, असे म्हणणारे हे भाजपचे नेते या सर्वांना खतपाणी देत असेल तर, महाराष्ट्र हे सहन करणार नाही. जयंत पाटील हे महाराष्ट्राचे नुसते नेते नाहीत, माजी मंत्री नाहीत तर, ते शेतकरी आणि दिनदलित गरिबांसाठी आयुष्य वेचणारे राजारामबापू यांचे वारसदार आहेत. अशा नेत्यांविषयी बोलताना आपण कोणत्या पातळीवर बोलतोय, महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, बोलणार्‍यांना आपण तंबी का देत नाहीत?,' असा सवाल यशोमती ठाकुर यांनी केला.

'देवेंद्र फडणवीससाहेब तुम्ही कशाप्रकारे संस्कृतीचे जतन करत आहात हे संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. आम्ही कोणाविषयी काही बोलणार नाही. पण स्वतःच्या गिरेबानमध्ये झाकून बघा. गिरेबान में झांक के देखो, ये क्या हो रहा है. या सर्व काही गोष्टी अतिशय धक्कादायक आहेत, सहन करण्याजोग्या नाहीत. आम्ही हे सहन करणार नाही,' असा इशारा यशोमती ठाकुर यांनी दिला.  

'जयंत पाटील यांच्या परिवाराविषयी भाजपच्या आमदाराकडून जे काही बोलले गेलेले आहे, ते आम्ही सहन करणार नाही, त्याचा निषेध करतो. महाराष्ट्र देखील अशा भानगडी खपवून घेणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईविषयी कोण आलतू-फालतू बोलला तेव्हा भाजपकडून हा देशाच्या आईचा अपमान झाला, असा कांगवा केला गेला. जयंत पाटील यांची आई ही आमची देखील आई आहे, महाराष्ट्रा-देशाची आई आहे, या महाराष्ट्रामध्ये आम्ही आई-वडिलांचा अपमान सहन करणार नाही. तुम्ही तुमच्या नेत्यांना तंबी देऊन शिस्तीत वागवलं पाहिजे,' असेही यशोमती ठाकूर यांनी सुनावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com