Thane Lok Sabha Election 2024: एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) रणधुमाळीत उमेदवारांकडून आरोप- प्रत्यारोप सुरू असताना, ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार तथा विद्यमान खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांच्या चैत्र नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी भाजप आमदार संजय केळकर (Sanjay Kelkar) यांनी बुधवारी सायंकाळी आवर्जून हजेरी लावत देवीचे दर्शन घेतले.
या वेळी राजन विचारे यांनी इच्छुक उमेदवार संजय केळकर यांचा सत्कारही केला. या भेटीने राजकीय पक्षातील नेत्यांच्या चांगल्याच भुवया उंचावल्या आहेत. नवमीला अशाप्रकारे केळकर यांनी अचानक भेट दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघावर (Thane Lok Sabha Constituency) शिंदेसेना आणि भाजपने (BJP) दावा केल्याने या जागेचा तिढा वाढला आहे. महायुतीकडून अजूनही उमेदवार जाहीर न करता प्रचाराचा धुरळा उडवला जात आहे.
त्यातच इंडिया आघाडीकडून (India Alliance) उमेदवार म्हणून राजन विचारे यांचे नाव जाहीर करून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. याशिवाय भाजपने हा मतदारसंघ खेचण्यासाठी अद्यापही जोर लावलेला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तर भाजपकडून इच्छुकांच्या यादीत माजी खासदार संजीव नाईक आणि आमदार संजय केळकर यांची नावे आघाडीवर आहेत. तसेच शिंदे सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या व्हायरल पत्रकाने त्यांचे नाव उमेदवार जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मात्र भाजप आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील (Thane) छत्रपती शिवाजी महाराज मैदानात राजन विचारे (Rajan Vichare) यांच्या वतीने आयोजित केलेल्या चैत्र नवरात्रोत्सवाच्या नवमीला सायंकाळी हजेरी लावत, देवीचे दर्शन घेत देवीला साकडे घातले.
या वेळी आयोजक राजन विचारे यांनी आमदार केळकर यांचं स्वागत करून शाल श्रीफळ देत जाहीर सत्कार केला. एकाच लोकसभेचे परस्पर विरोधक इच्छुक आणि उमेदवारांच्या या भेटीने राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींच्या चांगल्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे ही देवी नेमकी कोणाला पावणार हेच पाहावे लागणार आहे.
(Edited By Jagdish Patil)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.