Anand Dighe sarkarnama
मुंबई

Thane Lok Sabha : ठाण्यात धनुष्यबाण की कमळ? शिवसैनिकांनी मेळाव्यात केली मोठी मागणी

Lok Sabha Election 2024 : ठाणे हा लोकसभा मतदारसंघ दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचा आहे. आणि त्यांच्यानंतर हाच मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे.

Pankaj Rodekar

Thane Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जाणारा ठाणे लोकसभा मतदारसंघात Thane Lok Sabha constituency शिवसेना (शिंदे गट) की भाजपचा उमेदवार असणार हे निश्चित झाले नाही. एकनाथ शिंदे ठाण्याच्या जागेसाठी आग्रही आहेत, तर भाजपदेखील ठाणे मतदारसंघावरून दावा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे ठाण्याचा महायुतीमधील उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, ठाणे मतदारसंघातील उमेदवार हा धनुष्यबाणावरच उभा राहावा, असा आग्रह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात व्यक्त केला.

ठाणे हा लोकसभा मतदारसंघ दिवंगत शिवसेना (Shivsena) ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचा आहे. आणि त्यांच्यानंतर हाच मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. त्यामुळे या ठिकाणी धनुष्यबाणावरच उमेदवार उभा राहावा, अशी इच्छा ठाण्यातील बाळकुम येथे आयोजित शिवसेनेच्या ( शिंदे गट) मेळाव्यात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

ठाण्यातील बाळकुम -कोलशेत-मनोरमानगर या घोडबंदर रोडवरील सर्वच प्रभागांचा मिळून शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा गुरुवारी (ता.11) माजी नगरसेवक देवराम भोईर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. लोकसभेसाठी इच्छुक असलेले माजी आमदार रवींद्र फाटक म्हणाले, ठाणे शहराचा उमेदवार हा धनुष्यबाणचा उमेदवार असावा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची कामे घेऊन लोकांसमोर पोहाेचवायचे आहे. तसेच पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी त्यांची काम लोकांपर्यंत पोचवायची आहेत. या ४० दिवसांत मुख्यमंत्री शिंदे हे जो कोणी उमेदवार देतील त्याला निवडून आणायचे आहे.

उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. आमच्या सर्वांची एकच इच्छा आहे ठाणे लोकसभा ही आनंद दिघे यांची आणि त्यांच्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांची आहे. त्यामुळे येथून धनुष्यबाणावर ही निवडणूक लढवावी. आमच्यात मतभेद नाहीत. मुख्यमंत्री जो उमेदवार देतील आपल्याला जास्त मताधिक्याने त्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे, असे आवाहन आमदार प्रताप सरनाईक यांनी केले.

जो निर्णय एकनाथ शिंदे घेतील त्याचे पालन करण्यासाठी हा शिवसैनिक तयार आहे. नरेंद्र मोदी आणि अमीत शाह यांना शब्द दिला आहे. महाराष्ट्रातूनच 45 पेक्षा जास्त निवडून आणू. त्यात ठाण्याची जागा पण आहे. 45 जागांपैकी सर्वात जास्त मतधिक्याने ठाण्यातील उमेदवार निवडून आला पाहिजे. तसेच समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करू, असा दावा माजी महापौर नरेश म्हस्के यांनी केला.

(Edited By Roshan More)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT