Gajanan Kirtikar News : 'ईडीच्या वापराला लोकं कंटाळली, चीड निर्माण झाली'; शिंदे गटाच्या खासदाराचा भाजपला घरचा आहेर

Loksabha Election : चारशे पारच्या पलीकडे भाजप जात असताना इतर गोष्टी करायची काय गरज आहे. तुम्ही संसद ताब्यात घ्या. पण दुसऱ्या बाजूला विरोधकांचा सन्मानदेखील ठेवला पाहिजे.
Gajanan Kirtikar
Gajanan Kirtikarsarkarnama
Published on
Updated on

Gajanan Kirtikar News : ईडीकडून राजकीय सोयीसाठी भाजप BJP वापर करत असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेते करतात. मात्र, भाजपचे महायुतीतील साथीदार असलेल्या शिंदे गटातील खासदार गजानन कीर्तिकर यांनीच ईडीच्या वापरावरून भाजपला घरचा आहेर दिला आहे. ईडीचा वापर करण्याची भाजपला आवश्यकता नाही. ईडीच्या वापराविषयी फार मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झाली आहे. ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे, असे गजानन कीर्तिकर यांनी ठणकावून सांगितले.

चारशे पारच्य पलीकडे भाजप जात असताना इतर गोष्टी करायची काय गरज आहे. तुम्ही संसद ताब्यात घ्या, पण दुसऱ्या बाजूला विरोधकांचे सन्मानदेखील ठेवला पाहिजे. मोदीसाहेबांचे काम मी जवळून पाहिले आहे. मोदी (Narendra Modi) साहेब पुन्हा पंतप्रधान व्हावेत, ही माझी इच्छा आहे. मोदींनी पुढील पाचच नव्हे तर पुढील दहा वर्षे देशाचे नेतृत्व करावे, असेदेखील गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) म्हणाले.

Gajanan Kirtikar
Akola Lok Sabha 2024: तुमचे वडील खासदार असताना आमचे गाव दिसले नाही का? अनुप धोत्रेंना ग्रामस्थांनी विचारला जाब

गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात असले तरी त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर हे ठाकरे गटात आहेत. अमोल हे उत्तर-पश्चिम मतदारसंघातून ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार असणार आहेत. अमोल कीर्तिकर यांच्यावर खिचडी घोटाळ्या प्रकरणी ईडीने नोटीस दिली होती. या प्रकरणी त्यांची चौकशीदेखील सुरू आहे. या प्रकरणात अमोल कीर्तिकर यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचे गजानन कीर्तिकर म्हणाले. आपण महायुतीत असून, महायुतीच्याच उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे गजानन कीर्तिकर यांनी स्पष्ट केले.

आज 400 पारचा नारा लावला आहे. त्यामध्ये दर्प आहे. हा दर्प मोदी किंवा शाहांमध्ये नाही. राज्याचे कार्यकर्ते तसे वागतात. राज्यात रामदास आठवले महायुतीत आहेत. त्यामुळे त्यांची आंबेडकरी मते महायुतीसोबत आहेत. शिवसेनेची ताकद महाराष्ट्रात आहे. मित्रपक्षाला सत्तेत वाटा मिळायला पाहिजे. या व्होट बँकेचा फायदा युतीच्या उमेदवारांना जिंकण्यासाठी होत असतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं काम अधोरेखित झाले पाहिजे, असेदेखील कीर्तिकर यांनी स्पष्ट केले.

R

Gajanan Kirtikar
Shrikant Shinde News: बॉस वागतो तसे कार्यकर्त्यांना करावे लागते; श्रीकांत शिंदेंचा दरेकरांच्या आडून ठाकरे, राऊतांवर वार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com