Jitendra Awhad, Narendra Modi Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad News : शरद पवारांना अजितदादांची काय गरज, थेट तुमच्याकडेच आले असते; आव्हाडांचे मोदींना उत्तर !

Pankaj Rodekar

Thane News : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी देखील देशातील सर्वात उच्च नेता असा, शरद पवार यांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या सारखा 84 वर्षीय योद्धा कधीही हताश आणि निराश होऊ शकत नाही.ज्या विचारधारेसाठी त्यांनी स्वतःचं घर तुटताना पाहिलं त्यांना यायचं असतं तर कधीच आले असते. त्यांना अजितदादांची काय गरज ते थेट तुमच्याकडे आले असते. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर दिले आहे. तुम्ही तुमच्या जेष्ठ नेत्यांचा सन्मान कसा करतात. हे संपूर्ण भारताने पाहिले आहे, असेही आव्हाड यांनी सुनावले आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली होती. ते हाताश आणि निराश झाले असल्याचे वक्तव्य करत करत ते अजित पवार यांच्या मध्यस्थीने आमच्या सोबत येण्यास इच्छूक होते, असे वक्तव्य मोदी यांनी केले होते. मोदींच्या या वक्तव्याचा समाचार घेत जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना जोरदार उत्तर दिले आहे. ते म्हणाले, शरद पवार हताश आणि निराश झालेत नाहीत. विजयच्या उत्साहाने अग्रेसर भूमिका घेऊन ते पुढे जात आहेत. जे काही त्यांनी दौरे केलेत,त्याच्यामध्ये शरद पवार हाताश आहेत असे म्हणणे म्हणजे तुम्ही शरद पवार यांना ओळखलंच नाही. शरद पवार यांचे त्यांच्या विचारधारेवर प्रेम आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ज्या विचारधारेसाठी त्यांनी स्वतःचं घर तुटताना पाहिलं त्यांना तुमच्याकडं यायचं असतं तर कधीच आले असते. त्यासाठी अजितदादांची काय गरज ते थेट तुमच्याकडे आले असते. मोदी यांनी अशाप्रकारे चुकीचे वक्तव्य लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि पक्षापक्षांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी केल्याची टीका आव्हाडांनी केली. मुळात तुम्ही तुमच्या जेष्ठ नेत्यांचा सन्मान कसा करतात? हे संपूर्ण भारताने पाहिले आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बाळासाहेबांची नकली संतान असा उल्लेख नरेंद्र मोदींनी केला, याबाबत आव्हाड यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, असे म्हणणे चुकीचं आहे. तुम्ही बाळासाहेबांच्या मातृत्वावर आणि पितृत्वावर शंका घेत आहेत का? बाळासाहेबांच्या बद्दल असे अपमानास्पद उद्गार काढणे हे अतिशय चुकीचे आहे. मी त्याचा निषेध करतो.तसेच त्यांच्या मातेबद्दल संशय घेणे हे चुकीचं आहे असे होताच कामा नये,असेही आव्हाड म्हणाले.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT