Beed News, 10 May : आम्ही कधीही भाजपच्या विरोधात नव्हतो. भाजपचे ( bjp ) 106 आमदार गेल्यावेळी निवडून दिले होते. पण, राज्यात मोदींच्या चार ते पाच नेत्यांमध्ये मराठा द्वेष भरलेला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm Narendra Modi ) यांच्यावर वारंवार प्रचाराला येण्याची वाईट वेळ आली आहे, असं विधान मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील यांनी केलं आहे. ते बीडमध्ये एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.
"जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आम्ही कधीच ओबीसींच्या ( Obc ) विरोधात आम्ही नव्हतो. असं असते, तर गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे ( Pankaja Munde ), धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ), प्रीतम मुंडे यांना निवडून दिलं नसतं. तुम्ही जाणूनबुजून वाटेला जात असाल, तर मराठा तुम्हाला सहकार्य करणार कसा?" असा सवाल जरांगे-पाटलांनी ( Manoj Jarange Patil ) उपस्थित केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"मराठ्यांच्या एकीची अन् मतांची भीती वाटली पाहिजे"
"मी महायुती किंवा महाविकास आघाडीला निवडून द्यावं, असं बोललो नाही. सगेसोयरे आणि ओबीसी आरक्षणाच्या बाजूनं असलेल्यांना सहकार्य करा. मराठ्यांच्या एकीची आणि मतांची भीती वाटली पाहिजे. आम्ही कुणाचंही काहीही केलं नसून, आम्हाला जातीयवादी ठरवलं जातंय," अशी खंत मनोज जरांगे-पाटलांनी व्यक्त केली.
“चंद्रकांत पाटील मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेत”
"मी चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांच्या वाटेला गेलो होतो का? मी आरक्षणाबाबत गैरसमज पसरवतोय, असं चंद्रकांत पाटील यांचं मत आहे. पण, एवढ्या मोठ्या नेत्याला आपण काय बोलतो, हे समजलं पाहिजे. मी कधी माझ्यासाठी आरक्षण मागितलं आहे? माझ्या वाटेला जाण्याची काही चंद्रकांत पाटलांना गरज काय आहे? पाटील तेरे नाम नाही, तर काय आहेत. नदीतील खेकड्यावाणी भांग पाडतात. ते मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेत. कोल्हापुरात 67 मतदार तरी मागे आहेत का? आता बघतोच, कसा आमदार होतो," असा एकेरी उल्लेख करत जरांगे-पाटलांनी चंद्रकांत पाटलांना आव्हान दिलं आहे.
“मोदी मराठा समाजाच्या विरोधात बोलतात”
“मराठा समाज सगळ्यात मोठा आहे. तरी पंतप्रधान मोदी मराठा समाज्याच्या विरोधात बोलतात. ओबीसींना आयोगानं आरक्षण दिलंय. पण, आमच्याकडे नोंदी आहेत. आमच्यासारखं ओरिजनल आरक्षण कुणाचंच नाही. तुम्ही मराठा, पटेल, गुर्जर, जाट, यादव जाती संपवायला निघाला आहात का?” असा संतप्त सवाल जरांगे-पाटलांनी पंतप्रधान मोदींना विचारला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.