Jeetendra Awhad Sarkarnama
मुंबई

Thane Lok Sabha Constituency : ...तर मराठी पोरांना नोकरीसाठी गुजरातला जावे लागेल, आव्हाड कडाडले !

Pankaj Rodekar

Thane News : रोजगार देणाऱ्या कंपन्या गुजरातला जातात, तर मराठी पोरांना रोजगार मिळणार कुठून आता आपल्या पोरांना नोकरीसाठी महाराष्ट्र सोडून गुजरातला जावे लागेल, अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली. भारतात 83 टक्के लोक बेरोजगार आहेत. भारताचा विकासदर 4 पेक्षा खाली जाईल आणि तो गेला तर आपली परिस्थिती ही पाकिस्तान आणि श्रीलंकेपेक्षा वाईटच असेल, असेही त्यांनी या वेळी म्हटले आहे.

याच दरम्यान त्यांनी महाराष्ट्र, (Maharashtra) कर्नाटक, बंगाल, बिहार सगळीकडेच नाराजी आहेत. तर मग एवढ्या जागा आणणार कुठून पाकिस्तानमधून का? अशी बोचरी टीका करत, मोदी सरकारला डिवचण्याचे काम आव्हाडांनी केले आहे. तर, गारपीटनंतर शरद पवार एकटेच शेतकऱ्यांसाठी धाऊन जातात. बाकी सगळेच राजकारण करतात असेही ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाण्यात (Thane) सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना आव्हाडांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. या वेळी त्यांनी निवडणुकीच्या आधी अनेक रोजगार मेळावे लागतात, ऑन ट्रेनी आणि अप्रेंटिसमध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकत नाही. असे सांगितले जाते. यावरून लोकांना वेडं बनवणं हेच यांचं काम असल्याचे दिसत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच पहिल्यांदा निवडून आल्यानंतर लोकांना आशा दाखवल्या. त्याचे काय झालं ते सांगा. तसेच दहा वर्षांत दिलेली वचने किती पूर्ण केली ते सांगा, असा सवाल या वेळी आव्हाडांनी केला आहे

आव्हाड म्हणाले, शेतकरी, (Farmer) महागाई आणि बेरोजगारी यावरून लोकं चिडलेली आहेत. या तिन्ही गोष्टींवर लोकसभेच्या निवडणुका लढल्या जातात. लोकांना खायला अन्न नाही आणि तुम्ही मांसाहारी की शाकाहारी याचं भांडण काढत बसतायत, असेही आव्हाड म्हणाले. या दरम्यान आव्हाडांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , प्रफुल पटेल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.

आमदार रोहित पवारांच्या आरोपांना आव्हाडांचा दुजोरा

गुंडांचे फोन येतात. हे शंभर टक्के खरं आहे. ते गुंड कोण आहेत, कोणत्या गॅंगचे आहेत,त्यांच्यावर किती मर्डर केसेस आहेत. किती गुन्हे आहेत याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. दहशत निर्माण व्हावी यासाठी गँगचा वापर केला जात आहे . आमदार रोहित पवार जे बोलले त्यात एक शब्दही खोटा नाही, असेही आव्हाडांनी या वेळी सांगितले.

(Edited by : Chaitanya Machale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT