Vishal Patil News : मोठी बातमी! सांगलीत विशाल पाटलांची बंडखोरी,अपक्ष अर्ज दाखल; मविआची डोकेदुखी वाढली

Sangli Loksabha Election 2024 : ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सांगलीवरून गेल्या 15 दिवसांपासून घमासान सुरू होते. पण ठाकरेंनी माघार घेतलीच नाही उलट काँग्रेसलाच दोन पावलं माघारी यावं लागलं
vishal patil, chandrahar pa
vishal patil, chandrahar patil sarkarnama
Published on
Updated on

Sangli News : सांगलीत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी परस्पर सांगलीत चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीसह काँग्रेसमध्ये तीव्र नाराजीची लाट उसळली होती. त्यातच आता सांगली लोकसभा मतदारसंघातून एक मोठी अपडेट समोर येत आहे. काँग्रेसचे नेते विशाल पाटलांनी अखेर सांगली मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच उद्या ते सांगलीत मोठं शक्तिप्रदर्शन करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम होता. पण त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी सांगलीत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीरही करून टाकली. आणि तिथेच महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडला. मागील 5 वर्षांपासून लोकसभेची तयारी सुरू केलेल्या काँग्रेसच्या विशाल पाटलांनी (Vishal Patil) ठाकरेंच्या या कुरघोडीवरून उघड-उघड नाराजीही व्यक्त केली.

vishal patil, chandrahar pa
Solapur, Madha Lok Sabha : ईडीनं ताणलं की मोहिते पाटील पुन्हा भाजपमध्ये जातील; 'वंचित'च्या उमेदवाराचं मोठं विधान

ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सांगलीवरून गेल्या काही दिवसांपासून घमासान सुरू होते. पण ठाकरेंनी माघार घेतलीच नाही उलट काँग्रेसलाच दोन पावलं माघारी यावं लागलं. मोठा राजकीय वारसा पाठीशी असतानाही विशाल पाटलांना आपली तलवार म्यान करावी लागली. पण आता विशाल पाटलांनी बंडाचं निशाण फडकवलं आहे.

सांगलीमध्ये काँग्रेस (Congress) नेते विशाल पाटील यांचे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू होते. पण ही जागा आता शिवसेनेला (उद्धव ठाकरे) (Shiv Sena) गेली आहे. चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना आधीच उमेदवारीही जाहीर झाली आहे. ही जागा काँग्रेसलाच मिळावी, यासाठी आमदार विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी दिल्लीवारीही केली. पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशाल पाटलांना उमेदवारी न मिळाल्याने सांगली काँग्रेसमध्ये तीव्र नाराजीची लाट आहे.विशेष म्हणजे विश्वजित कदमांनी आपली भूमिका जाहीर करण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत विशाल पाटलांनी अवाक्षरही काढले नाही.त्यांच्या चेहर्यावरची नाराजी लपून राहिली नव्हती.

विशाल पाटील यांना आघाडीची उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सोशल मीडियात एक पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. ‘आमचं काय चुकलं? आता लढाई जनतेच्या कोर्टात’, असं या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे विशाल पाटील या निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरणार, अशी चर्चा सुरू झाली होती. आणि आता त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांच्या अडचणी वाढणार असून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची दाट शक्यता आहे.

R

vishal patil, chandrahar pa
Udayanraje Bhosale News: उदयनराजेंनी उमेदवारीसाठी भरलं डिपॉझिट; पण अर्ज भाजप की ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com