Thane Municipal Corporation  Sarkarnama
मुंबई

ठाणे महापालिकेच्या उपायुक्तांवर निलंबनाची कुऱ्हाड, नेमके प्रकरण काय?

TMC officer suspension latest news : ठाणे महापालिकेच्या उपायुक्तांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून या निर्णयामागील नेमके कारण काय आहे, याची सविस्तर माहिती वाचा.

Rashmi Mane

ठाणे महापालिकेत मोठी प्रशासकीय कारवाई करत अतिक्रमण विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. बोरिवली तालुका परिसरातील भूसंपादन प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष निघाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कर्तव्यात हलगर्जीपणा आणि नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

बोरिवली तालुक्यातील भूखंड क्रमांक 455, 456, 457, 457 (1 ते 3) आणि 458 या जमिनींच्या संपादन प्रक्रियेदरम्यान मोठे फेरफार झाल्याचे समोर आले. जमिनीचा मोबदला ठरवताना बाजारभावाऐवजी सदनिकांच्या विक्री दरांचा आधार घेतल्याने मूल्यांकन अवास्तव वाढवण्यात आल्याचा आरोप आहे.

याशिवाय भारग्रस्त जमिनीसाठी करावयाची आवश्यक वजावटही करण्यात आली नाही. त्यामुळे शासनाच्या तिजोरीला मोठा आर्थिक फटका बसल्याचे सांगितले जात आहे. संबंधितांना अनुचित लाभ मिळावा यासाठी दर जाणीवपूर्वक वाढवण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उमेश बिरारी यांच्याकडे महापालिकेतील पाच महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी होती. मात्र त्यांच्या कार्यकाळात अनेक वादग्रस्त प्रकरणे समोर आली होती. भूसंपादनातील अनियमिततेसोबतच शील फाटा परिसरातील अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिल्याचे आरोपही वारंवार झाले. या भागात बेकायदा बांधकामे वाढत असताना योग्य वेळी कारवाई न केल्यामुळे त्यांच्यावर टीका होत होती.

या सर्व पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने निलंबनाचा निर्णय घेतला. या कारवाईमुळे ठाणे महापालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुढील चौकशीत आणखी गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या प्रकरणात इतर अधिकाऱ्यांचाही सहभाग समोर येऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT