Thane Municipal Corporation results Sarkarnama
मुंबई

Thane Municipal Election Results : ठाणे मनपा निवडणूक निकाल; दिग्गजांना धक्का की नवख्यांची मुसंडी? एका क्लिकवर जाणून घ्या कोण जिंकले, कोण हरले!

Thane Mahanagarpalika Election Result 2026 : ठाणे महानगरपालिका निवडणूक निकाल जाहीर. दिग्गज नेते पराभूत झाले की नवख्यांनी बाजी मारली? एका क्लिकवर जाणून घ्या विजेते आणि पराभूत.

Rashmi Mane

Thane Municipal Election Results: Winners, Losers & Big Upsets : ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले असून, संपूर्ण शहराचे लक्ष या निकालांकडे लागले होते. यंदाच्या निवडणुकीत ठाणेकरांनी उत्फुर्त सहभाग नोंदवत सरासरा 55.59 टक्के मतदान झाले होते. कोणाच्या गळ्यात सत्ता येणार याचा फैसला आज झाला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रमुख राजकीय केंद्र मानले जाणाऱ्या ठाण्यात. यंदाची निवडणूक फार महत्त्वाची होती. त्यामुळे ही निवडणूक केवळ स्थानिक नाही, तर राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरली होती. भाजप-शिवसेना युती आणि ठाकरे गट यांच्यात यावेळी थेट लढत पाहायला मिळाली. अनेक प्रभागांमध्ये दिग्गज उमेदवारांसमोर नवख्या चेहऱ्यांचे आव्हान उभे राहिले होते.

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता राहिली आहे. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे हे शिवसेनेचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जाऊ लागले. फक्त 1987 ते 1993 या काळात काँग्रेसने येथे सत्ता मिळवली होती.

त्यानंतर पुन्हा शिवसेनेने वर्चस्व राखले. यंदाच्या निवडणुकीत ही परंपरा कायम राहणार हे निश्चित झाले आहे. ठाण्यामधून ज्या उमेदवारांनी विजयाची मुसंडी मारली आहे जाणून घेऊया त्या उमेदवारांची यादी.

ठाणे महापालिकेची यादी पुढीलप्रमाणे...

प्रभाग क्रमांक १९

पॅनल अ

शिवसेना शिंदे गट- मीनल संख्ये- १५९७९

शिवसेना ठाकरे गट- अस्मिता बनकर- ८०४८

नोटा- १०१३

पॅनल ब

शिवसेना शिंदे गट - नम्रता भोसले- १७२२४

काँग्रेस- वृषाली जाधव- २५६८

मनसे- प्रणाली मोरे - ४४५९

नोटा- ७९०

पॅनल क

शिवसेना शिंदे गट- विकास रेपाळे- १७२३५

शिवसेना ठाकरे गट- रविंद्र कवळे- ६४८६

अपक्ष - शरद गाढवे - ३९७

नोटा- ७९०

पॅनल ड

शिवसेना शिंदे गट- राजेंद्र फाटक- १७०१९

शिवसेना ठाकरे गट- अनिल मोरे ६६६१

नोटा- १२६१

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT