Mumbai BMC Election 2026 : मुंबई महापालिकेत किती मुस्लीम उमेदवार विजयी? पाहा संपूर्ण विजयी उमेदवारांची यादी एका क्लिकवर!

BMC Election 2026 Muslim Candidates Results : मुंबई महापालिका निवडणूक 2026 मध्ये किती मुस्लीम उमेदवार विजयी झाले? वार्डनिहाय संपूर्ण यादी, निकाल आणि राजकीय विश्लेषण एका क्लिकवर वाचा.
Who won BMC elections 2026: Full list of winners in Mumbai civic polls
Who won BMC elections 2026: Full list of winners in Mumbai civic pollsSarkarnama
Published on
Updated on

Muslim Candidates Victory BMC : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल हळूहळू स्पष्ट होत असताना मुंबईच्या राजकारणात अनेक अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळत आहेत. यंदाच्या निवडणुकीत अनेकांचे अंदाज फेल ठरले असून काही ठिकाणी चुरशीच्या लढतीतून नवे चेहरे पुढे आले आहेत. विशेषतः विविध पक्षांतून उभ्या असलेल्या मुस्लिम उमेदवारांच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

मुंबईच्या पूर्व उपनगरांतील मानखुर्द–गोवंडी परिसरात राजकीय चित्र वेगळेच दिसून आले. या भागात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात AIMIM पक्षाने ठळक उपस्थिती नोंदवली आहे. अनेक वार्डांमध्ये थेट लढतीत AIMIM च्या उमेदवारांनी बाजी मारली.

Who won BMC elections 2026: Full list of winners in Mumbai civic polls
BMC election result news : मुंबईत ठाकरेंचा 'करिष्मा'? पण राज्यात भाजपची लाट; पाहा कुणाचं वर्चस्व? वाचा सुरुवातीचे कल!

वार्ड क्रमांक 134 मधून महजबीन अतीक अहमद यांनी विजय मिळवत आपल्या समर्थकांचा विश्वास सिद्ध केला. तर शेजारच्या वार्ड क्रमांक 135 मध्ये इरशाद खान यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत यश मिळवले. याच परिसरातील वार्ड क्रमांक 145 मधून खैरुनिसा हुसैन विजयी झाल्याने या पक्षाचे स्थान अधिक मजबूत झाले आहे.

काँग्रेस पक्षाच्या मुस्लिम उमेदवारांनीही या निवडणुकीत प्रभावी कामगिरी केली आहे. कुर्ला पश्चिम भागातून अशरफ आझमी यांनी विजय मिळवला आहे. तसेच वार्ड क्रमांक 33 मध्ये काँग्रेसचे आमदार असलेल्या अस्लम शेख यांच्या बहिणी क़मर जहाँ मोईन सिद्दीकी यांनी यश संपादन केले. या निकालांकडे शहरी भागात काँग्रेसला मिळणाऱ्या अल्पसंख्याक पाठिंब्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.

Who won BMC elections 2026: Full list of winners in Mumbai civic polls
BJP setback : भाजपला मोठा राजकीय धक्का! अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांचा अनपेक्षित पराभव

शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून तसेच इतर पक्षांतूनही मुस्लिम उमेदवार विजयी झाले आहेत. वार्ड क्रमांक 124 मधून शकीना शेख यांनी मतदारांचा विश्वास मिळवला आहे. तर वार्ड क्रमांक 201 मध्ये इरम सिद्दीकी यांनी विजय मिळवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com