Thane Municipal Corporation Sarkarnama
मुंबई

Thane Politics : शिवसेनेकडून भाजपचा टप्प्यात कार्यक्रम, अवघ्या 3.5 कोटींचा निधी देत कोंडी; उपमहापौर कृष्णा पाटील आक्रमक

Shivsena Vs BJP : शिवसेनेला आतापर्यंत तब्बल १५४.३० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना मिळून ४.४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

राहुल क्षीरसागर

Thane News : ठाणे पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर तीन सर्वसाधारण सभा पार पडल्या. या सभांच्या माध्यमातून शहरातील विकासकामांच्या निधी वाटपावरून महापालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. सत्ताधाऱ्यांकडून निधी वाटपात दुजाभाव करण्यात आल्याचा गंभीर आरोप उपमहापौर कृष्णा पाटील यांनी केला आहे. तर, विरोधी पक्षाला आमच्यापेक्षा अधिक निधी दिल्याने नाराजी व्यक्त केली.

ठाणे महापालिका महासभेत पुन्हा एकदा महायुतीतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले असून उपमहापौर कृष्णा पाटील यांनी सभागृहातील कामकाजाच्या पद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनासह सत्ताधारी गटावर गंभीर आरोप केले.

नियम, प्रक्रिया आणि सभा शास्त्र डावलून कोट्यवधी रुपयांचे विषय मंजूर केले जात असल्याचा आरोप करत त्यांनी सभागृहातील कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेल्या चार महासभांमध्ये मोठ्या आर्थिक तरतुदींचे प्रस्ताव चर्चेविना मंजूर करण्यात आल्याचा दावा करत त्यांनी ४३२ कोटी रुपयांच्या विषयांवर आक्षेप घेतला.

अशातच विविध विकासकामांसाठी निधी मंजूर करताना सत्ताधाऱ्यांनी पक्षनिहाय असमतोल ठेवला आहे. शिवसेनेला आतापर्यंत तब्बल १५४.३० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना मिळून ४.४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, महापालिकेत भाजपचे २८ नगरसेवक असतानाही त्यांच्या प्रभागांसाठी केवळ ३.०५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या निधी वाटपामुळे भाजप नगरसेवकांच्या प्रभागांतील विकासकामांवर परिणाम होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, निधी वाटपामध्ये पारदर्शकता ठेवून सर्व पक्षांच्या नगरसेवकांना समान न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच विकासकामांमध्ये राजकीय भेदभाव टाळण्याचे आवाहनही उपमहापौरांनी केले आहे. तसे न झाल्यास आगामी काळात हा मुद्दा महापालिकेच्या सभागृहात आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजप शिवसेनेवर केलेल्या आरोपांना काँग्रेसच्या आरोपांचा समाचार देखील त्यांनी घेतला आहे. ठाण्यात संपलेल्या काँग्रेसने आमच्यावर आरोप करू नये असा सल्ला त्यांनी काँग्रेसला दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT