Thane Municipal Corporation Sarkarnama
मुंबई

Thane Municipal Corporation : ठाणे महापालिकेची प्रभाग रचना जाहीर, इच्छुकांमध्ये नाराजी; पक्षांकडून मोर्चेबांधणी

Thane Ward Structure Elections : आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाणे महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.

Roshan More

Thane News : ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना अखेर जाहीर करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तयार केलेली ही रचना शनिवारी (२३ ऑगस्ट) प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये २०१७ प्रमाणेच चार सदस्यांचा एक प्रभाग आणि तीन सदस्यांचा एक प्रभाग ठेवण्यात आला असून, एकूण ३३ प्रभागांमधून १३१ नगरसेवक निवडून येणार आहेत.

वाढलेली लोकसंख्या पाहता प्रभाग रचनेते बदल होऊन जागा वाढतील, अशी इच्छुकांची अपेक्षा होती. मात्र, मागील निवडणुकीप्रमाणेच ही प्रभाग रचना असल्याने इच्छुकांमध्ये नाराजी निर्माण झाली. तर, प्रारुप रचनेनुसार राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणनी सुरू केली आहे.

नागरिकांकडून हरकती आणि सूचना

२०११ च्या जनगणनेच्या आधारावर तयार केलेल्या या प्रारूप आराखड्यावर नागरिकांना हरकती व सूचना देण्यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत येणाऱ्या सूचना आणि आक्षेपांचा आढावा घेतल्यानंतर नगरविकास खात्याकडून अंतिम आराखडा निवडणूक आयोगाला पाठवला जाणार आहे. अंतिम प्रभाग रचना ३ ते ६ ऑक्टोबरदरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे.

प्रभाग क्रमांक २५ सर्वात मोठा

महापालिकेने जाहीर केलेल्या आराखड्यानुसार कळवा येथील प्रभाग क्रमांक २५ हा सर्वात मोठा असून, येथील लोकसंख्या ६२,६९७ आहे. तर दिवा येथील प्रभाग क्रमांक २९ हा सर्वात लहान असून लोकसंख्या ३८,१७२ आहे. या प्रभागातून तीन नगरसेवक निवडून येणार आहेत.

निवडणूक कार्यक्रम

२१ ऑगस्ट : प्रारूप आराखड्याला निवडणूक आयोगाची मान्यता

२ ते ८ सप्टेंबर : नागरिकांकडून हरकती व सूचना

९ ते १५ सप्टेंबर : नगरविकास खाते आयोगाला सुधारित आराखडा सादर करणार

१६ ते १७ सप्टेंबर : अंतिम आराखडा आयोगाकडे पाठवला जाणार

३ ते ६ ऑक्टोबर : अंतिम प्रभाग रचना जाहीर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT